माणगांव येथील ”गो कोरोना ” या ऑनलाईन विडियो स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ मोठ्या उत्साहात संपन्न
माणगांव, विश्वास गायकवाड – माणगांव तालुक्यातील आयटी कंप्युटर एज्युकेशन क्षेत्रातील सुप्रसिद्ध उद्योजक डॉ अजय आत्माराम मोरे आणि त्यांच्या सौभाग्यवती अंकिता अजय मोरे यांचे चिरंजीव कुमार जय मोरे याच्या पाचव्या वाढदिवसा निमित्त जय चे वडील डॉ अजय मोरे यांनी रविवार दिनांक ३१ जानेवारी २०२१ रोजी सायंकाळी माणगांव येथील रिव्हरलॅन्ड रिसॉर्ट अँड लॉन्स, वाकडाई मंदिर समोर, उतेखोल गांव, येथे ” गो कोरोना ” ऑनलाईन विडियो स्पर्धा आयोजित केल्या होत्या.
या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे व जेष्ठ समाज सेवक मा.श्री.अण्णा साबळे, माणगांव तालुका व्यापारी असोसिएशन अध्यक्ष- मा.श्री.लक्ष्मण दळवी, कारोना च्या काळात रात्रंदिवस जनतेची सेवा करणारे कर्तव्यदक्ष ट्रॅफिक पोलीस मा.श्री.विशाल येवले तसेच पुण्याहून आलेले सुप्रसिद्ध एकपात्री कलाकार मा.श्री.महेंद्र गणपुले तसेच माणगांव येथील विशेष निमंत्रित पाहुण्यांची उपस्थिती लाभली होती.
सदर ऑनलाईन विडियो स्पर्धेत माणगांव मधील कु.सिद्ध घाडगे (ई – आठवी) , प्रथम क्रमांक, अनम सलीम शेख( ई- सातवी),द्वितीय क्रमांक आणि कु.राकेश शिकवण (पंधरावी ) तृतीय क्रमांक पटकावला विजेत्यांना रोख रक्कम, ट्रॉफी, मेडल आणि प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आले.
कार्यक्रमाची सुरवात सुप्रसिद्ध एकपात्री कलाकार श्री.महेंद्र गणपुले यांनी अनेक संमेलनात आपला गाजलेला कार्यक्रम ” हास्य नगरी ” सादर करून उपस्थित पाहुण्यांना मंत्रमुग्ध करून सुखद अनुभव दिला व टाळ्यांनी व हास्यानी दाद मिळवली, त्यानंतर प्रमुख पाहुणे यांच्या हस्ते व विशेष आमंत्रित पाहुण्यांच्या उपस्थित गो कोरोना !… ऑनलाईन विडियो स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ संपन्न झाला.
कार्यक्रमाच्या शेवटी डॉ.अजय आत्माराम मोरे यांच्या मोठा मुलगा कु.जय अजय मोरे याचा ५ वा वाढदिवस लहान मुलांच्या सोबत व मोरे फॅमिली सह मोठ्या आनंदात साजरा करण्यात आला, शेवटी भोजन समारंभ कार्यक्रमाचा आस्वाद घेत माणगांव मध्ये अतिशय निसर्गरम्य ठिकाणी मुंबई व पुण्यासारख्या रिव्हरलॅन्ड रिसॉर्ट अँड लॉन्स या ठिकाणी कार्यक्रम उत्कृष्ट नियोजन, फार वेगळा व हटके कार्यक्रम पहायला मिळाल्याबदल सर्व पाहुणे व विशेष उपस्थित पाहुण्यांना एक सुखद अनुभव दिल्याची जबरदस्त प्रतिक्रिया मिळाल्या.