वैजनाथ मंदिराची माहिती आता फक्त एका क्लिकवर, श्री वैजनाथ देवस्थान ट्रस्टच्या अधिकृत वेबसाईटचे श्रावणमहिन्यानिमित्त उद्घाटन

0 132

परळी वैजनाथ – देशातील बारा ज्योतिर्लिंगापैकी पाचवे ज्योतिर्लिंग असलेल्या बीड जिल्ह्यातील परळीच्या वैजनाथ ज्योतिर्लिंग देवस्थान ची अधिकृत वेब साईट आज सुरू करण्यात आली. http://vaijnathjyotirling.com/ असे वेबसाईट चे नाव आहे.या वेबसाईटमुळे वैद्यनाथ मंदिर बाबत माहिती आता जगाच्या काना-कोपऱ्यात असलेल्या शिवभक्तांना आता फक्त एका क्लिकवर उपलब्ध होणार आहे.श्रावण महिन्याचा पावन पर्वावर या वेबसाईट चे उद्घाटन तहसीलदार तथा वैजनाथ देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष डॉ.विपीन पाटील यांच्या हस्ते संपन्न झाले.

सदाशिव अन्नछत्र या ठिकाणी झालेल्या छोटेखानी कार्यक्रमात वैजनाथ देवस्थान ट्रस्ट च्या अधिकृत वेबसाईटचे उद्घाटन संपन्न झाले. या वेबसाईटवर प्रभू वैजनाथाचे नित्य दर्शन,वैजनाथ मंदिरात होणाऱ्या नित्य षोडपचार पुजा मंदिराच्या परिसरात असलेले धार्मिक स्थळ तसेच तालुक्यातील पर्यटन स्थळांची माहिती उपलब्ध असणार आहे. या वेबसाईटमुळे भाविकांना प्रभू साठी देणगीही देता येणार आहे.आज श्रावण महिन्याच्या पावन पर्वावर या वेबसाईटचे उद्घाटन करण्यात आले यावेळी वैजनाथ देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष तथा तहसीलदार डॉ.विपीन पाटील,सचिव राजेश देशमुख यांच्यासह विश्वस्त प्रा.बाबासाहेब देशमुख,नंदकिशोर जाजू,प्रा.प्रदिप देशमुख, अनिल तांदळे,विजयकुमार मेनकुदळे,डॉ. गुरूप्रसाद देशपांडे,नागनाथराव देशमुख, शरदराव मोहरीर,रघुवीर देशमुख,निळकंठ पुजारी आदी उपस्थित होते.

error: Content is protected !!