शेत मालाला पुण्यात बाजारपेठ मिळवून देण्यासाठी प्राध्यापकाचा प्रयत्न !

0 197

शेतकऱ्यांकडून थेट ग्राहकांना गाठण्यासाठी ‘संकल्प ऍग्रो फ्रेश’ ब्रँड

पुणे : शेतकऱ्यांच्या शेत मालाला पुण्यात बाजारपेठ मिळवून देण्यासाठी पुण्यातील  प्रशांत चव्हाण या युवा प्राध्यापकाने प्रयत्न सुरु केले असून ‘पवनसुत शेतकरी उत्पादक संघ’ या जळगाव आणि आसपासच्या जिल्ह्यातून शेतमाल थेट पुण्यातील ग्राहकांना ,सोसायट्याना देण्यासाठी ‘संकल्प ऍग्रो फ्रेश’ हा ब्रँड तयार करण्यात आला आहे.

या उपक्रमाद्वारे उत्तम दर्जाची विषमुक्त (रासायनिक खते व कीटकनाशक मुक्त) ताज्या भाज्या,फळे, लिंबू आदी कृषी उत्पन्न थेट पुणे,पिंपरी चिंचवड आणि तळगाव परिसरात उपलब्ध करून देण्यात येत आहे. शेतकऱ्यांकडून थेट ग्राहकांना गाठण्यासाठी ‘संकल्प ‘रविवारी 5 जलै 2020 रोजी संकल्प अॅग्रो फ्रेश या संस्थेमार्फत ‘शेतातून थेट घरात’ या संकल्पनेतून पुणे, पिंपरी चिंचवड व तळेगाव दाभाडे येथे विषमुक्त ( रेसिड्यू फ्री) लिंबू नागरिकांना उपलब्ध करून दिला जात आहे.स्वतः  शेतकरी पुत्र असलेले प्रा.प्रशांत चव्हाण हे पुण्यात डॉ पी ए इनामदार आय ए एस सेंटर चे संचालक आहेत. लॉक डाऊन काळात आणि नंतर शेतकऱ्यांच्या निर्माण झालेल्या अडचणी पाहून त्यांनी हा उपक्रम सहकारी तत्वावर शेतकऱ्यांना सोबत घेवून सुरु केला आहे.

‘अपेडा’ या शासकीय संस्थेकडून शेतमाल विषमुक्त असल्याचे   प्रमाणपत्र   भाजीपाला व फळे उत्पादक शेतकर्यानी प्राप्त केले आहे.संपूर्ण सोसायटीतील सदस्य मागणी नोंदवित असतील तर सोसायटीत लिंबू व फळेभाज्या उपलब्ध करून दिल्या जातील असे संकल्प ॲग्रो फ्रेश चे संचालक प्रशांत चव्हाण यांनी सांगितले.

या खरेदीला   पहिल्या दिवशी रविवारी ५ जुलै रोजी पुणेकर नागरिकांचा खुपच चांगला प्रतिसाद मिळाला व नागरिकांनी पुढच्या रविवारी 12 जुलै 2020 रोजी पुन्हा मागणी नोंदवली आहे. तरी अजून कोणाला होलसेल दरात उत्तम दर्जाची विषमुक्त (रासायनिक खते व कीटकनाशक मुक्त) ताजी भाजी ,फळे ,लिंबे हवी असल्यास 7028896981 मोबाईल क्रमांकावर संपर्क करून आजच आपली मागणी नोंदवावी,असे आवाहन करण्यात आले आहे.

चिमूर तालुक्यातही शिरला कोरोना

 

error: Content is protected !!