सणासुदीच्या दिवसांत २०० विशेष रेल्वे धावणार

2 200

परभणी, प्रतिनिधी – दसरा आणि दिवाळीच्या सणांसाठी रेल्वेच्या वतीने १५ ऑक्टोबर ते ३० नोव्हेंबर या काळात दोनशे विशेष रेल्वेगाड्या चालविण्यात येणार आहेत, अशी माहिती रेल्वे बोर्डाचे अध्यक्ष व्ही. के. यादव यांनी दिली.
१५ ऑक्टोबर ते ३० नोव्हेंबर या काळात दोनशे विशेष रेल्वेगाड्या चालविण्यात येणार आहेत. तसंच राज्य सरकारांच्या गरजेनुसार प्रवासी वाहतुकीचा दैनंदिन आढावा घेण्याचा निर्णयही रेल्वेने घेतलाय.

lok offer
सध्या सुरू असणाऱ्या गाड्या
– राजधानी विशेष गाड्यांच्या १५ जोड्या
– लांब पल्ल्याच्या १०० गाड्या एक जून रोजी सुरू
– १२ सप्टेंबरपासून आणखी ८० गाड्या सुरू
सर्व विभागीय व्यवस्थापकांना आपापल्या भागातील स्थानिक प्रशासनाशी चर्चा करून करोनास्थितीचा आढावा घेण्यास सांगण्यात आले आहे. तूर्त दोनशे गाड्या सुरू करण्याचे नियोजन आम्ही केले आहे, प्रत्यक्षात कदाचित यापेक्षा अधिक गाड्याही सुरू होऊ शकतात. राज्य सरकारांच्या गरजेनुसार प्रवासी वाहतुकीचा दैनंदिन आढावा घेण्याचा निर्णयही रेल्वेने घेतल्याची माहिती यादव यांनी दिली. जेथे गरज असेल, तेथे प्रवासी गाड्या सुरू केल्या जातील, असे ते म्हणाले. सध्या सुरू असणाऱ्या गाड्यांच्या पुरवणी गाड्यांचे (क्लोन ट्रेन) भारमानही साठ टक्क्यांच्या आसपास असल्याची माहितीही यादव यांनी दिली. जेथे पुरवणी गाड्याही भरतील, अशा ठिकाणी प्रतीक्षा यादी संपुष्टात आणण्यासाठी आणखी गाड्या सोडण्याचीही योजना रेल्वे करीत आहे.

error: Content is protected !!