सुखजिंदर सिंग रंधावा होणार पंजाबचे नवे मुख्यमंत्री

0 129

नवी दिल्लीः चंदीगड: कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर अखेर सुखजिंदर सिंग यांच्याकडे पंजाबच्या मुख्यमंत्रीपदाची सूत्रे देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी आणि अंबिका सोनी यांच्यात झालेल्या तब्बल दोन तासाच्या बैठकीनंतर हा निर्णय घेण्यात आला आहे. थोड्याच वेळात त्यांच्या नावाची अधिकृत घोषणा केली जाणार आहे. रंधावा यांचं नाव फायनल झाल्यानंतर ते राज्यपालांना भेटण्यासाठी रवाना झाले आहे

पंजाब काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नवज्योत सिंग सिद्धू आणि अमरिंदर सिंग यांच्यात गेल्या अनेक दिवसांपासून कलह सुरू होता. यानंतर शनिवारी अमरिंदर सिंग यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला. सुखजिंदर सिंग रंधवा हे पंजाबचे नवे मुख्यमंत्री असतील, असं सूत्रांकडून सांगण्यात येत आहे.सुखजिंदर रंधवा हे पंजाबचे नवे मुख्यमंत्री असतील, असं आता सांगितलं जात आहे. रंधवा हे तीन वेळा आमदार झाले आहेत. ६२ वर्षीय रंधवा हे अमरिंदर सिंग मंत्रिमंडळात कारागृह आणि सहकार मंत्री होते. गुरदासपूरचे रहिवासी असलेले रंधवा हे पंजाब काँग्रेसचे उपाध्यक्षही राहिले आहेत. त्यांचे वडील संतोख सिंग दोन वेळा पंजाब काँग्रेसचे अध्यक्ष होते.कॅप्टन अमरिंदर सिंग हे आमचे वरिष्ठ नेते आहेत. मी नेहमीच मला माझ्या वडिलांप्रमाणे आहेत. त्यांनी मला त्यांच्या मुला-भावासारखं वागवलं. आमच्यात मतभेद आहेत, पण त्यांनी माझ्याविरुद्ध कधीही नकारात्मक प्रतिक्रिया दिली नाही. अंतिम निर्णय हा हायकमांड घेईल, असं सुखजिंदर सिंग रंधवा म्हणाले.पंजाब काँग्रेसचे माजी अध्यक्ष सुनिल जाखड, प्रताप सिंह बाजवा आणि माजी मुख्यमंत्री बेअंत सिंग यांचे नातू रवनीत सिंग बिट्टू हेही मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत आहे. एक दलित शीख मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री, हा फॉर्म्युला असल्याच्या राजकीय चर्चा सुरू आहेत. हे संकट अतिशय वाईट पद्धतीने हाताळलं जात असल्याने पक्षातील अनेक नेते नाराज असल्याचंही सूत्रांनी सांगितलं.

गटबाजी रोखण्यासाठी निर्णय

सूत्रांच्या मते रंधावा यांचं नाव पंजाबच्या मुख्यमंत्रीपदासाठी फायनल झालं आहे. फक्त आज त्यांच्या नावाची घोषणा होणार आहे. रंधावा हे ज्येष्ठ नेते आहेत. सिद्धू यांना मुख्यमंत्रीपद दिल्यानंतरही सिद्धू आणि अमरिंदर सिंग गटाच्या कुरघोडी सुरूच राहू शकतात. सिद्धू गटाने जाखड यांना विरोध केल्याने जाखड यांच्याकडे मुख्यमंत्रीद जाखड आणि सिद्धू गटातही तू तू मै मै होऊ शकते. त्यामुळेच रंधावा यांचं नाव फायनल केल्या गेल्याचं सांगितलं जात आहे. रंधावा यांना मुख्यमंत्रीद दिल्यास गटातटाच्या राजकारणाला तिलांजली दिली जाऊ शकते. तसेच दीड वर्षानंतर होणाऱ्या निवडणुकीत त्याचा काँग्रेसला फटका बसणार नाही, म्हणूनच रंधावा यांचं नाव मुख्यमंत्री पदासाठी फायनल केल्याचंही सांगितलं जात आहे.

उद्या शपथविधी

दरम्यान, पंजाबमध्येही एक मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री असा फॉर्म्युला वापरला जाण्याची शक्यता आहे. रंधावा मुख्यमंत्री झाल्यास सिद्धू आणि दलित चेहरा म्हणून डॉय राजकुमार वेरका यांना उपमुख्यमंत्रीपद दिलं जाण्याची शक्यता आहे. उद्या चंदीगडमध्ये छोटेखानी समारंभात हा शपथविधी सोहळा पार पडणार आहे.

error: Content is protected !!