स्वामी ग्रुप तर्फे कोविड रुग्णांसाठी “मोफत अन्नदान”
अन्नदान हेच श्रेष्ठदान - शिवराज तांबोळी
नांदेड, गजानन जोशी – कोरोना वैश्विक महामारीमुळे संपूर्ण भारत व महाराष्ट्रासह नांदेड जिल्ह्यावर भयानक संकट ओढवलेले आहे,यादरम्यान कोविड संक्रमित रुग्णांमध्ये अनेक कुटुंबच्या कुटुंब बाधित होत असल्याने त्यांना रुचकर व घरगुती पद्धतीचे भोजन मिळावे,हा उद्देश ठेवून नांदेड शहरात स्वामी समर्थ अन्नदान ग्रुप तयार पुढे सरसावला, या ग्रुपने गत दिवसांपासून दररोज १००० लोकांना डब्बे पुरविण्याचे कार्य चालू केले आहे,व (दि.२७ एप्रिल पासून) सकाळी नाश्ता,दुपारचे जेवण,सायंकाळचे जेवण तीनवेळा घरगुती अन्नाचा डब्बा व पाणी बॉटल असे दिवसभरात ३००० रुग्णांसाठी पाठविला जाणार आहे…
तसेच या कार्याला असंख्य नागरिक यांनी भरीव मदत देत सहकार्य देखील केले आहे,यात काही व्यापारी बांधव,शासकीय कर्मचारी व मध्यमवर्गीय नागरिक सर्वजण आपापल्या आर्थिक क्षमतेप्रमाणे या अन्नदान कार्यास सहकार्य करत आहेत,या कार्यासाठी पुढाकार घेणारे शासनाचे कर्मचारी ग्राम विकास अधिकारी शिवराज तांबोळी व यांची टीम आहे,कोविड संक्रमण काळात जनतेला घरगुती चवीचे रुचकर अन्न (भोजन) देणे या सारखे मोठे पुण्याईचे कार्यच नाही,जास्तीतजास्त नागरिकांनी या अखंड अन्नदान कार्यास सहकार्य करावे,असे आवाहन संयोजन समिती यांच्यावतीने करण्यात आले आहे.