हरिपाठ विवेचन महोत्सवाची आळंदीत सांप्रदायिक वातावरणात सांगता

राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांची प्रमुख उपस्थिती

0 355

निफाड, रामभाऊ आवारे – अखिल भारतीय वारकरी मंडळ व संतचरीत्र गृप १,२ व३ यांच्या संयुक्त विद्यमाने व अखिल भारतीय वारकरी मंडळाच्या सर्व भाविकांच्या सहयोगातून २३ जुलै ते २० ऑगस्ट २०२१ या पूर्वकाळात हरिपाठ विवेचन
महोत्सव “स प्रारंभ करण्यात आला होता. दररोज रात्री ९ ते १०.३० या वेळेत ऑनलाइन पद्धतीने हरिपाठ विवेचन महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते.

या कार्यक्रमाची सांगता आज श्रीक्षेत्र आळंदी गुरुवर्य गोविंद महाराज केंद्रे ज्ञानेश्वरी मंदिर येथे शासनाच्या नियमांचे पालन करून राज्यमंत्री अब्दुल सत्तार , गुरुवर्य गोविंद महाराज केंद्रे संस्थानचे विश्वस्त नानजीभाई टक्कर, ज्ञानेश्वरी मंदिर आळंदी उत्तराधिकारी ह भ प विष्णु महाराज केंद्रे, मनपा स्थायी समिती सभापती दिनकर अण्णा पाटील नाशिक यांच्या प्रमुख उपस्थितीत अखिल भारतीय वारकरी मंडळाचे प्रदेशाध्यक्ष प्रेममूर्ती हभप अनिल महाराज वाळके यांच्या मार्गदर्शनाने अखिल भारतीय वारकरी मंडळाचे राष्ट्रीय अध्यक्ष हरिभक्त परायण प्रकाश महाराज बोधले (डिकसळ) यांच्या काल्याच्या किर्तनाने संप्रदायिक वातावरणात मोठ्या उत्साहाने संपन्न करण्यात आली असल्याची माहिती
संत चरित्र ग्रुप १,२ व ३ चे महाराष्ट्र प्रसिद्धीप्रमुख तथा निफाड तालुका प्रतिनिधी रामभाऊ आवारे यांनी दिली आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाने बंद केलेले धार्मिक कार्यक्रम पुन्हा सुरू व्हावे या करिता वारकरी संप्रदायाने एक पाऊल पुढे टाकले असून गुगल ॲप द्वारे अध्यात्मिक विचार महाराष्ट्र व महाराष्ट्राबाहेरील भाविकांना पोहोचली जावी याकरिता संत चरित्र ग्रुप १ ,२ व ३ यांच्या माध्यमातून व अखिल भारतीय वारकरी मंडळाच्या सर्व भाविकांच्या सहयोगातून हरिपाठ विवेचन महोत्सव हा उपक्रम सुरू करण्यात आला होता.

या कार्यक्रमात हरिपाठ विवेचन महोत्सवातील सहभागी विवेचन कार तसेच हरिपाठ विषयावर पीएचडी प्राप्त डॉक्टर सौ लताताई भरत पाडेकर पुणे यांच्या ” हरिपाठ एक आनंद वाट ” या पुस्तकाचे प्रकाशन अखिल भारतीय वारकरी मंडळाचे राष्ट्रीय अध्यक्ष ह भ प प्रकाश महाराज बोधले, महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष प्रेममूर्ती अनिल अण्णा वाळके, नाशिक विभागीय अध्यक्ष वाल्मिक महाराज जाधव, राज्य कार्यकारिणी सदस्य ह भ प जनार्दन महाराज काकडे नाशिक, नाशिक विभागीय सचिव राम-लक्ष्मण आवारे सर चांदवड यांच्या हस्ते संत चरित्र ग्रुप निर्माते ह भ प ज्ञानेश्वर माऊली सोनवणे, संत चरित्र ग्रुप प्रसिद्धीप्रमुख रामभाऊ आवारे वनसगाव, हभप राम महाराज उदागे, शंकर कोल्हे नैताळे, डॉ भरत पाडेकर, सौ सोनवणे ताई सौ जगताप ताई, ह-भ-प रावसाहेब जगताप,सुरेश पाटील यांच्या उपस्थितीत करण्यात आले.

या कार्यक्रमात अखिल भारतीय वारकरी मंडळाचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश महाराज बोधले प्रदेशाध्यक्ष अनिल अण्णा वाळके यांचा राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांच्या हस्ते पुणेरी पगडी, शाल ,श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.तसेच नाशिक विभागीय अध्यक्ष वाल्मिक महाराज जाधव, संत चरित्र गृप निर्माते ज्ञानेश्वर माऊली सोनवणे संत चरित्र गृप महाराष्ट्र प्रसिद्धीप्रमुख रामभाऊ आवारे,रामायणाचार्य राम महाराज उदागे, बाबासाहेब महाराज डांगे आदींसह महाप्रसादाचे यजमान सर्वश्री राजेंद्र महाराज काळे, नंदकुमार महाराज कोतवाल व लक्ष्मण आवारे सर चांदवड यांचा शाल श्रीफळ पुष्पगुच्छ देऊन यथोचित सत्कार करण्यात आला.

या कार्यक्रमाचे आयोजन राष्ट्रीय अध्यक्ष हभप प्रकाश महाराज बोधले, प्रदेशाध्यक्ष प्रेम मूर्ती हभप अनिल अण्णा वाळके यांच्या प्रेरणेने व नाशिक विभागीय अध्यक्ष हभप वाल्मिक महाराज जाधव, नाशिक जिल्हा महिला अध्यक्ष हभप शारदाताई सूर्यवंशी यांच्या कुशल मार्गदर्शनाने नाशिक विभागीय कोषाध्यक्ष तथा संत चरित्र ग्रुप निर्माते हभप ज्ञानेश्वर माऊली सोनवणे व संत मीराबाई चरित्र लेखिका हभप भागवतानुरागी कविताताई साबळे यांच्या संकल्पनेतून संत चरित्र गृप १,२ व ३ चे मुख्य संयोजक संत चरित्र गृप महाराष्ट्र प्रसिद्धीप्रमुख रामभाऊ आवारे सर वनसगाव, ह भ प राम महाराज उदागे नगर, हभप बाबासाहेब महाराज डांगे, हभप नवनाथ माऊली बोरगुडे, हभप जयाताई घाडगे,हभप मिनाताई महाराज मडके नगर, शंकर कोल्हे आदींसह वारकरी संप्रदायातील ज्येष्ठ श्रेष्ठ गुणीजन भक्तगण व माता भगिनीच्या वतीने करण्यात आले होते.

ऑनलाइन पद्धतीने घेण्यात आलेल्या हरिपाठ विवेचन महोत्सवात महाप्रसादाचे आयोजन संत यादव स्वामी भजनी मंडळ डावखर नगर चांदवड, सिद्धेश्वर भजनी मंडळ कोतवाल वस्ती चांदवड तसेच हभप राजेंद्र महाराज काळे चांदवड,हभप नंदकुमार कोतवाल, कोतवाल वस्ती चांदवड , हभप लक्ष्मण आवारे सर चांदवड डावखर नगर यांच्यावतीने करण्यात आले होते.

यावेळी हभप योगेश महाराज वागे, हभप पंडित महाराज क्षिरसागर, हभप गणेश महाराज डोंगरे, हभप काशिनाथ महाराज मोरे,हभप निवृत्ती महाराज रायते ,हभप भास्कर नाना रसाळ, हभप कैलास महाराज ढगे,मृदंगाचार्य गव्हाणे आबा,भास्कर आबा मांजरे,विजुशेठ पवार, बाळासाहेब शिरसाठ, ज्ञानेश्वर जाधव , राजेंद्र काळे नंदकुमार कोतवाल लक्ष्मण आवारे सर, हभप सिमाताई काळे,हभप मंगलताई काळे,हभप नवनाथ माऊली गांगुर्डे, शाम महाराज गांगुर्डे, संतोष महाले राजेंद्र नलगे ,रवींद्र कोतवाल, रावसाहेब जगताप,सुरेश पाटील, तुकाराम जाधव आदींसह
आळंदी, नासिक ,नगर, बीड, परभणी, सांगली, पुणे, नेवासा ,पाथर्डी, श्रीरामपूर, कोपरगाव, निफाड, चांदवड आदी जिल्ह्यातील व तालुक्यातील भाविक उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संत चरित्र गृप प्रसिद्धीप्रमुख रामभाऊ आवारे यांनी केले तर उपस्थितांचे आभार रामायणाचार्य राम महाराज उदागे यांनी मानले.

error: Content is protected !!