जालना जिल्ह्यातील 54 उत्कृष्ठ बालवाचकांचा एचएआरसी संस्थे तर्फे सन्मान

0 8

परभणी,दि 06 ः
विद्यार्थ्यांनी मोबाईलचा अतिवापर टाळून भाषेवर प्रभुत्व मिळवण्यासाठी तिन्ही भाषेतील वर्तमानपत्रे दररोज वाचावीत. सामाजिक कार्य करणाऱ्या सामाजिक संस्थांना समाजाने प्रतिसाद द्यावा. तसेच सर्व जिल्ह्यातील डायटच्या भाषा विभागाने वाचन चळवळ राबविण्यासाठी सहकार्य करावे असे आवाहन डॉ. प्रकाश मांटे यांनी केले.
होमिओपॅथिक अकॅडमी ऑफ रिसर्च अँड चॅरिटीज (एचएआरसी) तर्फे जालना जिल्ह्यातील जिल्हा परिषद शाळा दहिफळ येथे उन्हाळ्याची सुट्टी पुस्तकाची गट्टी  या उपक्रमातील सहभागी बालवाचकांचा सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला होता. या सोहळ्याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून डायटचे ज्येष्ठ अधिव्याख्याता डॉ. प्रकाश मांटे तर प्रमुख अतिथी म्हणून डायटचे जेष्ठ अधिव्याख्याता संजय येवते, एचएआरसी अध्यक्ष डॉ पवन चांडक, स्पर्धा समन्वयक प्रकाश डूबे हे उपस्थित होते. यावेळी जालना जिल्ह्यातील 17 शाळेतील 54 बालवाचकांचा सन्मानचिन्ह, सन्मानपत्र, ग्रंथ भेट देऊन गौरव करण्यात आला..

प्रमुख अतिथी संजय येवते यांनी विद्यार्थ्यांनी मन लावून पुस्तके वाचावी तसेच वाचन उपक्रम राबवताना विद्यार्थ्यांसाठी वाचलेल्या पुस्तकावर चाचणी घ्यावी असा सल्ला दिला.डॉ पवन चांडक यांनी एचएआरसी संस्था राबवत असलेल्या सामाजिक उपक्रमाविषयी माहिती दिली. स्पर्धा समन्वयक प्रकाश डूबे यांनी विद्यार्थ्यांना वाचन करताना वाचा, वेचा, आठवा, साठवा आणि पाठवा या पंचसूत्रीचा अवलंब करण्याचे आवाहन केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक स्पर्धा समन्वयक डॉ.पवन चांडक यांनी केले तर सूत्रसंचालन जावेद पठाण तर आभार प्रदर्शन पिंटू म्हैसनवाड यांनी केले. कार्यक्रमास मोठ्या संख्येने विद्यार्थी, पालक उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी जिल्हा समन्वयक राजीव हजारे, दत्तात्रेय राऊतवाड, अविनाश लोमटे, मनोज भराडे, नसीर खान पठाण, गजानन गवई, जाधव सर, राऊत सर अनिल देशमुख सर यांनी सहकार्य केले.
जि प शाळा श्रीरामतांडा, लिंबेवडगाव, तळणी, गेवराई, आरडा टोलाजी, वाटुर, राणीवाहेगाव, दहिफळ भोंगणे (पूर्व), दहिफळ भोंगणे (पश्चिम), पांडे पोखरी, ढालसखेडा, हस्तेपोखरी, सावरगाव वायाळ, ब्रम्हवडगाव, हास्तुर तांडा, पिंपळगाव खराबे या शाळेतील विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला.

error: Content is protected !!