जून-जुलैमध्ये कोरोनाबाधित रुग्ण ओळखणे होणार कठीण; ते कसे काय जाणून घ्या !

0 208

जुन, जुलै आणि आँगस्ट हे महिने अत्यंत महत्त्वाचे

सध्या सर्वत्र कोरोना विषाणूची दहशत पसरलेली आहे. तर आता पुढील जुन, जुलै आणि आँगस्ट महिन्यात या आजाराचा उद्रेक होणार असल्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. हे तीन महिने ऋतू बदलाचे असून, या दरम्यान सर्दी, ताप, खोकल्याच्या आजाराचे रुग्ण वाढीस लागतात. तेव्हा साधा फिव्हर कोणता आणि कोरोना फिव्हर कोणता हे ओळखणे आरोग्य विभागाला कठीण जाणार आहे. असे जरी असले तरी अद्यापही आयसीएमआरने याबाबत कुठलीही गाईड लाईन्स जारी केले नसल्याने जिल्हा पातळीवर त्याबाबत कुठलेही नियोजन करण्यात आलेले नाही.

ताप किंवा थंडी वाजणे, थरथरणे, स्नायूंमध्ये दुखणे, डोकेदुखी,खोकला किंवा घसा खवखवणे, चव न कळणे किंवा वास न येणे सध्या ही लक्षणे कोरोना झाल्याची आहे. मात्र, हीच लक्षणे नवीन ऋतू सुरु झाला की आपल्या आरोग्यात बदल होऊ लागतात. ताप, सर्दी खोकला हे तर ठरलेले आजार आहेत. तेव्हा कोणता रुग्ण हा कोरोना बाधित आहे आणि कोणता रुग्ण साध्या आजाराचा आहे हे कळणे कठीण जाणार आहे. यासाठी आरोग्य विभाग पुढील काही दिवसात याबाब काही नियोजन करणार जरी असले तरी अद्यापही आयसीएमआरकडून याबाबत कुठलेही दिशा निर्देश प्राप्त झाले नसल्याचे सांगण्यात आले आहे. तेव्हा वेळेवर आलेल्या गाईड लाईन्सनंतर आरोग्य विभागाची तारांबळ नक्कीच उडणार यात शंका नाही.

तपासणी होणार तरी कशी?

साधा सर्दी, ताप, खोकला आणि कोरोना लक्षणे असलेली लक्षणे याची तपासणी करावी लागणार आहे. तेव्हा या दोन्ही रुग्णांची सरसकट तपासणी केले जाणार आहे का? आणि तसे जर झाले तर जून आणि जुलैमध्ये कोरोनाचा संसर्ग झाल्याशिवाय राहणार नाही.

लेटेस्ट अपडेट साठी like आणि follow करा शब्दराज फेसबुक पेजला…

लॉकडाऊन- 4.0 ची घोषणा : 18 मे ते 31 मे पर्यंत महाराष्ट्रात लॉकडाऊन कायम

लाॅकडाऊन 4.0 : महाराष्ट्रात काय राहणार सुरु आणि काय बंद जाणून घ्या !

अबब ! चीनमध्ये कोरोनाबाधित ६ लाख ४० हजार रुग्ण; ८४ हजार रुग्णसंख्या खोटी

तळीरामांसाठी खुशखबर… येथे करा अर्ज; घरपोच मिळेल मद्य

लुडो, कॅरम, पब्जीत तरूणाई लॉकडाऊन

कोरोनाची स्थिती पाहून 30 मे नंतर आषाढी वारी पालखी सोहळयाबाबत अंतिम निर्णय-उपमुख्यमंत्री अजित पवार

किसान योजनेतील २००० रुपयांचा लाभ मिळाला नसेल तर ‘अशी’ करा तक्रार

लाॅकडाऊन 4.0 संदर्भात केंद्र सरकारची मोठी घोषणा जरुर वाचा

आनंदाची बातमी… दिड महिन्याचे बाळ व ४ वर्षाच्या मुलाने केली कोरोनावर मात

error: Content is protected !!