एका ‘ क्लिक’मध्ये मिळणार पीककर्ज प्रकाश सोळंके यांचा पुढाकार : सादोळ्यातून उपक्रम होईल सुरु

0 143

माजलगांव,प्रतिनिधी:- पीक कर्जासाठी शेतकऱ्यांची कागदपत्रे काढताना होणारी ससेहोलपट थांबावी , यासाठी आ . प्रकाश सोळंके यांनी पुढाकार घेऊन शेतकऱ्यांची विविध कार्यालयाशी निगडित सर्व कागदपत्रे ऑनलाइन घेऊन केवळ अर्ज आणि के.वाय.सी. साठीची कागदपत्रे घेऊन तात्काळ कर्ज वाटप करा अशा सूचना आ . सोळंके यांनी दिल्यानंतर याची प्रक्रिया सुरु झाली असून , शुक्रवारी सादोळा येथून एका क्लिकमध्ये शेतकऱ्यांना पीक कर्जाची सुख्यात होणार आहे .
पीक कर्ज म्हटले की , सातबारा , ८ अ चा उतारा , हमीपत्र , फेरफार नक्कल , इकरार पत्र , ना हरकत प्रमाणपत्र , नजर नकाशा अशी विविध कागदपत्रे बँकेकडून मागितली जातात . ही कागदपत्रे गोळा करताना शेतकऱ्यांची अक्षरश : दमछाक होते . तसेच मोठ्या प्रमाणात मानसिक व आर्थिक पिळवणूक देखील होते . वास्तविक पाहता ही सर्व कागदपत्रे आता ऑनलाईन उपलब्ध आहेत .

सोळंके यांच्या बँकांना सूचना
संबंधित कागदपत्रे ही बँकेने त्या – त्या कार्यालयांच्या साईटवरून घेऊन केवळ शेतकयांकडून अर्ज आणि के.वाय.सी. साठीचेच कागदपत्रे घेऊन एका क्लिकमध्ये पीक कर्ज द्यावे या बाबत.येथील आ . प्रकाश सोळंके यांनी पुढाकार घेत बँक अधिकाऱ्यांना सूचना केल्या त्यावरुन आजपासून शेतकऱ्यांना केवळ एका क्लिकमध्ये पीककर्ज देण्याच्या प्रयोगाला सादोळा येथून सुरुवात करण्यात येणार असल्याची माहिती आ . सोळंके यांनी दिल्याने शेतकन्यांमधून समाधान व्यक्त केल्या जात आहे .

पीक कर्ज घेताना बँकांकडून सातबारा , ८ अचा उतारा , हमीपत्र , फेरफार नक्कल , इकरार पत्र , ना हरकत प्रमाणपत्र , नजर नकाशा अशा विविध कागदपत्रांची मागणी केली जाते . आता या प्रक्रियेत या सर्व बाबींना फाटा देऊन फक्त फक्त अर्ज आणि केवायसी करून पीक कर्ज बँकां शेतकऱ्यांना देणार आहेत .

परळी एसबीआयच्या संपर्कातील त्या 1418 लोकांची होणार कोरोना टेस्ट

 

error: Content is protected !!