” सुरगाणा” तालुक्याला निसर्गाने बहाल केली सुंदर निसर्ग सौंदर्य देणगी…

1 265

सुरगाणा, प्रतिनिधी- सुरगाणा तालुक्यातील सर्वच गावानां निसर्गाने भरभरून दिले आहे.माणसाची घेण्याची शक्ती, कुवत संपेल परंतु निसर्गाचे हात रिते होत नाही. परिसरात हिरवेगार डोगर,दऱ्या, झरे, झाडे,झुडपे, वेली, पशू, पक्षी काय काय बघावे आणि कितीदा बघावे तालुक्यातील निसर्ग सौंदर्य बघून डोळ्यांचे पारणे फिटते पण वारंवार पाहत राहावे डोळ्यांत ,मनात साठवत ते सौंदर्य ह्रदयात जतन केलें जाते अशी निसर्ग सौंदर्याची खाण सुरगाणा तालुका,बा-हे परिसर “भिवतास धबधबा”,मनखेड- जाहुले परिसर माचघर,बोरगाव परिसर हातगड किल्ला,उंबरठाण परिसर ताता पाणी अशा विविध प्रकारच्या नयनरम्य परिसराला निसर्गाचें वरदानच प्राप्त झाले आहे.

” परिसरात असंख्य झाडाच्या प्रजाती आढळतात डोगरवरील, दऱ्या खोऱ्यात असणाऱ्या घनदाट जंगल विस्तीर्ण झाडे, गवताळ कुरणात अनेक प्रजातींचे वृक्ष,वेली, झुडपे,फुले, तसेच अनेक प्रकारच्या औषधी वनस्पती आढळतात,
परिसरातील निसर्ग म्हणजे सृष्टी. पृथ्वी, पाणी, अग्नी, वायू व आकाश या पंचतत्त्वांनी बनलेली सृष्टी. या निसर्गाचे व मनुष्याच नात अगदी त्याच्या जन्मापासूनचे असते. मनुष्याच जन्म याच निसर्गाच्या पंच तत्त्वातूनच होतो. व त्याच पंचतत्त्वात विलीन होतो. तेव्हा आपले व निसर्गाचे नात अतूट नाही का आहे. आपण या निसर्गात जन्म घेतो, वाढतो, व शेवटी विलीन होतो. आणि म्हणूनच या निसर्गाच जतन करणे ,पोषण करणे त्याची वृद्धी करणे हे आपले कर्तव्य आहे.

निसर्ग हाच आपला गुरु, हाच आपला मित्र व हाच आपला डॉक्टर सुद्धा आहे. निसर्ग आपणा करता खूप मोठा वरदान आहे. त्याच्या कडन आपणास आवश्यक सर्व घटक जस पाणी, राहण्यास घर व अन्न सुद्धा मिळते. निसर्गाकडून आपणास किती काही शिकायला मिळते. जस फूल काट्यात फूलते तस आपणही प्रत्येक संकटात हसत राहवे. झाडांप्रमाणे खंबीर उभ राहून नेहमी दुस-यांना मदद करणे. नदी जशी कितीही अडथडे आली तरी वाहते तसच आपणही सर्व कष्टानां न घाबरता सामोरे जाणे. आणखी बरच काही हा निसर्ग आपणास शिकवतो.

निसर्ग तर खरा चित्रकार आहे. किती रम्य चित्र तो रोज रंगवतो व आपणास प्रेरणा देतो. खोल द-या खो-या, निर्मळ झरे तलाव, रम्य अथांग सरोवरे, बेफाम समुद्र, घनदाट अरण्य, बर्फाच्छादित शिखरे, उतुंग पर्वत, कमळांनी भरलेली तळे, वां-याच्या झोक्यावर डोलणारी हिरवीगार शेते, नारळी केळांच्या बागा, डोंगरा आडून उगविणारा सूर्य व त्याची सोनेरी आकाशात गुलाल उधळणारी सूर्य किरणे. हे सर्व किती किती सूंदर आहे. आणि याचा अनुभव आपण रोज करतो.

येवढच नाही तर या निसर्गात समावतात ते वेगळे वेगळे ऋतू. हे निसर्गाचे ऋतुचक्र पण जाता जाता दु:खानंतर सुख येतेच असा संदेश देत जातात. रिमझिम पाउस व त्यामुळे उठणारा मातीचा सुगंध, तसेच थंड वा-याची झोका, व त्या बरोबर येणारा फुलांचा सुगंध, उन्हाळ्यात हीच झुळूक मनाला जीवाला किती मनमोहक वाटते. नदीच्या लाटा, पक्षीची किलबिल, सकाळची सूर्याची कोवळी किरणे, सूर्यास्ताच्या वेळीस तांबूस होत जाणारे आकाश, सर्व काही निसर्गाची किमया आहे. निसर्गाने आपणास दिलेले देणगी आहे.

निसर्ग आपणास जिवलग मित्रा प्रमाणेच काहीही न मागता देखील केवढ काही देतो. मग आपणही या निसर्गाला काहीतरी दिले पाहिजे . वाढत्या जंगलतोडीमुळे मुळे व वाहतुक पाणी प्रदूषणा मुळे निसर्गाचे सौंदर्य दिवसे न दिवस कमी होत आहे. आकाशातील चांदोबा उंच उंच इमारतीच्या मागे लपलेला आहे. जंगल तोड मुळे पाउस कमी पडत आहे. आणि यामुळे निसर्गाच्या भयंकर रूपाचे दर्शन आपणास घडत आहे. अतिवृष्टीने नदया नाल्यांना पूर येऊन नुकसान होत आहेत. तर कधी भूकंपाने हजारो घरे जमीनदोस्त होत आहेत.तेव्हा आपल हे कर्तव्य आहे कि निसर्गाचे संतुलन ठेवले पाहिजे कारण मनुष्याच व निसर्गाच अतूट नाते आहे. आणि निसर्ग हाच माझा सोबती आहे हे मानले पाहिजे….

प्रतिक्रिया :- सुरगाणा तालुक्यातील प्रत्येक गावाला खुप मोठ्या प्रमाणावर निसर्ग सौंदर्य प्राप्त झाले आहे, हे सौंदर्य टिकवून ठेवण्यासाठी प्रत्येक नागरिकाने, लोकप्रतिनिधी, व प्रशासनाने प्रयत्न करून नवीन उपाय योजना आखून त्या प्रभावीपणे अंमलात आणल्या पाहिजे.जेणे करून परिसर पर्यटन विकास व तरुणांना रोजगार निर्माण होईल.

कोरोनातून 5 व्यक्ती झाले बरे, 34 व्यक्ती बाधित तर एकाचा मृत्यू

 

error: Content is protected !!