महावितरणाने ग्राहकांच्या समस्या तातडीने सोडविण्या संदर्भात विकास सोमेश्वर ह्यांच्यातर्फे महावितरणला निवेदन

0 193

अंबरनाथ,प्रतिनिधी  –  लॉकडाउन दरम्यान महावितरण कार्यालयाकडून प्रत्यक्ष रिडिंग घेऊन नागरिकांना 3 महिन्याचे सरासरी यूनिटप्रमाणे विद्युत बिल देऊन महावितरणाच्या समस्या तातडीने सोडविण्यात याव्यात. अन्यथा स्वाभिमान संघटना अंबरनाथ अध्यक्ष विकास हेमराज सोमेश्वर ह्यांच्यातर्फे महावितरणच्या विरोधात आंदोलन करणार असल्याचा इशारा त्याअनुषंगाने दि.16 जुलै 2020 रोजी लेखी निवेदनाव्दारे देण्यात आला. हे निवेदन पत्र ऊर्जा मंत्री डॉ. नितीन राऊत, अंबरनाथ शहर पोलीस स्टेशन तसेच अंबरनाथ नगरपरिषद ह्यांना देखील देण्यात आले आहे.

कोरोनासारख्या रोगाचे संकट राज्यभरात नव्हेतर देशभरात वाढत आहे. तसेच संपूर्ण देशात लॉकडाऊनची सूचना जाहिर करण्यात असल्याने नागरिकांना घरीच राहण्याचे आवाहन केले. त्यामुळे नागरिकांचे काम धंदे बंद ठेवण्यास सांगितल्याने नोकरदार, व्यापारी, दुकानदार आणि लघु उद्योजक ह्यांना मोठ्या प्रमाणात आर्थिक अडचणीस सामोरे जावे लागत होते. तसेच लॉकडाउन दरम्यान स्वतःचा व कुटुंबियांचा बचाव करण्याकरीता दैनंदिन गरजेच्या औषधे, वस्तु व अन्नधान्यासाठी पैसे खर्च करने कठिन झाले आहे.

त्यात टाळेबंदीच्या काळात घरगुती वीज ग्राहकांना महावितरण ह्यांच्याकडून 3 महिन्याचे मीटर रिडिंग न घेता विजेची बिले अंदाजीत पाठविण्यात आली. पण ती विजेची बिले नागरिकांनी भरली आहेत. परंतु, आता विद्युत कर्मचाऱ्यांनी काही ठिकाणी प्रत्यक्ष मीटर रिडींग घेतल्याने मागील व चालू रिडींगचे (युनिट) एकत्रित बिले करून नागरिकांना एकदम बिले पाठविण्यात आली. पण ही बिले जून महिन्यात काही नागरिकांना 3 महिन्याची रिडींग एकत्रित करून नागरिकांना मोठ्या स्वरूपात बिलाची रक्कम आकारण्यात आलेली आहे. हे बिले पाहून नागरिकांना धक्का बसला आहे. कारण महावितरण कर्मचाऱ्यांनी दर महिन्याला रिडींग न घेतल्यामुळे हा प्रकार झालेला असल्याचा इशारा विकास सोमेश्वर ह्यांनी केला आहे.

अशा अनेक महत्त्वाचे मुद्दे निवेदनाद्वारे विकास सोमेश्वर ह्यांनी अतिरिक्त अधिकारी शैलेश कलंत्री ह्यांच्या निदर्शनास आणून देत लेखी निवेदन देण्यात आला आहे. तसेच या निवेदनात येत्या 10 दिवसात म्हणजेच 27 जुलै 2020 रोजीपर्यंत काहीही उत्तर भेटले नाहीतर शासनाच्या पालन करत आम्हास नागरिकांना घेऊन महावितरणच्या विरोधात स्वाभिमानी मोर्चा काढण्यात येईल. तरी नागरिकांनी देखील यात सहभागी व्हावे असे आवाहन स्वाभिमान संघटना अंबरनाथ अध्यक्ष विकास हेमराज सोमेश्वर ह्यांनी केले आहे.

आता मिळणार होम क्वारंटाईनला परवानगी,पण….

गुगलच्या मदतीने वेब पोर्टलने घेतली गगन भरारी

 

error: Content is protected !!