मनमाड नगरपरिषद येथे सुनील कडासने यांनी मनमाड करांशी साधला संवाद

0 198

मनमाड,प्रतिनिधी – मनमाड शहर आणि परिसरात कोरोनाचा वाढता प्रसार रोखण्यासाठी प्रशासन आणि वैद्यकिय क्षेत्राबरोबरच सेवाभावी संस्था आणि संघटनांनीही प्रत्येक घराघरात पोहोचणे आवश्यक आहे . कोरोनामुळे जग त्रस्त झाले आहे . त्याविरूध्द लढण्यासाठी सर्व ती काळजी घेण्याची आणि वैद्यकिय क्षेत्रांतील उपचाराची गरज आहे . हा आजार लपवू नका , आपण सुरक्षित रहा आणि आपले कुटुंबही सुरक्षित ठेवा , प्रचार – प्रसाद आणि कायद्याचे पालन करा असे कळकळीचे आवाहन लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस अधिक्षक तथा कोविड १ ९ यासाठी मालेगाव येथे नियुक्त केलेले विशेष कार्यकारी अधिकारी तथा समन्वयक सुनिल कडासने यांनी मनमाड येथे केले .

मनमाड नगरपालिकेच्या डॉ.बाबासाहेब आंबेडकर सभागृहात कोविड १ ९ च्या पार्श्वभूमीवर श्री.कडासने यांनी मनमाड शहरांतील महत्वाच्या संपूर्ण विविध घटकांशी मुक्त संवाद साधला . मनमाड शहरात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव कसा रोखता येईल ? याबाबत चर्चा करण्यासाठी मंगळवारी दुपारी पालिका सभागृहात श्री.कडासने यांच्या प्रमुख उपस्थितीत शहरांतील प्रमुख डॉक्टर , इंजिनियर , व्यापारी , वकील , लोकप्रतिनिधी व शहरांतील मान्यवरांसोबत या संवाद कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते . मालेगांव येथील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्याच्या उद्देशाने शासनाने त्यांची समन्वय अधिकारी म्हणून नेमणूक केली . श्री.कडासने यांनी मालेगावला झपाट्याने काम करून कोरोना आटोक्यात आणण्यात महत्वाचे योगदान दिले . या पार्श्वभूमीवर मालेगाव येथील अनुभव डॉ.कडासने यांनी कथन केले . व्यांनी शहरातील विविध घटकांशी मुक्त संवादही साधला .

आपण प्रशासन आणि जनता यांच्यात संवाद म्हणून काम केलं . लोकांनीही भरपूर प्रतिसाद दिला आणि वैद्यकिय क्षेत्राने केलेल्या कामामुळे मालेगांवचा कोरोना आटोक्यात आला . त्यासाठी घराघरात पोहोचलो , कॉर्नर बैठका घेतल्या , नागरीकांना मार्गदर्शन केले त्यामुळेच हे शक्य झाले . मनमाड हे सव्वालाख लोकवस्तीचे शहर आहे . प्रशासनाने या शहरात वरीलप्रमाणे उपाययोजना राबवाव्या . कोरोना आटोक्यात आणण्यासाठी आणि त्याच्याविरोधात लढण्यासाठी वैद्यकिय मार्गदर्शन , ज्ञान , प्रशासनाच्या सूचना , वैयक्तीक काळजी , मास्कचा वापर , सोशल डिस्टनसिंग याची नितांत गरज आहे , असे डॉ.कडासने म्हणाले .

डॉ.साजिद अहमद आणि डॉ.फारूक शेख या डॉक्टर द्रींनी कोरोनासंदर्भात अत्यंत महत्वपूर्ण आणि मार्गदर्शक सूचना केल्या . कोरोनाला घाबरू नका , कोरोनामुळे मृत्यू होत नाही , गंभीर आजार असणाऱ्यांनाच त्यापासून धोका आहे . त्यामुळे असे रूग्ण आणि घरांतील ज्येष्ठ व्यक्ती यांची काळजी घ्या . कोविड -१ ९ हा काळ आणि सध्याची . परिस्थिती म्हणजे माणूसकीची सेवा करण्याची वेळ आहे , असे डॉक्टर द्वयींनी सांगितले . येथील प्रख्यात हृदयरोगतज्ञ डॉ.प्रविण शिंगी यांनीही मोलाचे मार्गदर्शन केले . आजच्या काळात सर्वच समाजघटकांनी लोकांमध्ये जागृती करण्याची एक नितांत गरज आहे .

आजार लपवू नका , त्याचे लवकर निदान करा , वैद्यकिय क्षेत्राचा सल्ला घ्या , असे डॉ.शिंगी म्हणाले . तत्पूर्वी मनमाड नगरपालिकेचे प्रशासन अधिकारी राजेंद्र पाटील यांनी प्रास्ताविक केले . उपजिल्हा रूग्णालयाचे वैद्यकिय अधिक्षक डॉ.जी.एस.नरवणे यांनी कोविड १ ९ च्या सद्यस्थितीचा आढावा घेतला . नागरीकांनी सूचनांचे पालन करावे , घराबाहेर पडतांना मास्कचा वापर करावा , सोशल डिस्टनसिंगचे नियम पाळावे आणि सावधानता बाळगावी असे आवाहन त्यांनी केले . डॉ.सुनिल बागरेचा यांनी मनोगत व्यक्त केले . प्रशासनाने घालून दिलेले नियम अधिक कडक केले तर वाढत्या – रूग्णसंख्येला आळा बसेल अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली . मनमाड पालिकेतील गटनेते व माजी नगराध्यक्ष गणेश धात्रक यांनी मनोगत व्यक्त केले . उपनगराध्यक्ष राजाभाऊ आहिरे , शिवसेनेचे शहरप्रमुख मयुर बोरसे , नगरसेवक गंगाभाऊ त्रिभूवन , शिवसेना उपजिल्हाप्रमुख संतोष बळीद आदींसह व्यापारी , व्यावसायिक , डॉक्टर , इंजिनियर , लोकप्रतिनिधी , नगरसेवक , विविध संस्था संघटनांचे कार्यकर्ते व नागरीक यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते . या संवाद कार्यक्रमात मनमाडच्या खाजगी डॉक्टरांबद्दल सर्वच घटकांनी गौरवोद्गार काढले . व कोविड १ ९ काळात त्यांनी केलेल्या कार्याचे कौतुकही केले . मनमाडच्या खाजगी डॉक्टरांनी गेल्या तीन महिन्यांत शहरांतील सर्व दुकाने सुरू ठेवले . दवाखाने बंद ठेवले नाही आणि संकटाच्या काळात जीव धोक्यात घालून डॉक्टरांनी काम केले . याबद्दल विविध वक्त्यांनी मनमाडच्या खाजगी डॉक्टरांचा गौरव केला .

उच्च माध्यमिक शालांत परीक्षेत घवघवीत यश संपादन केल्याने फरहा नाझ बेगचा सत्कार

error: Content is protected !!