csc सेंटर सुरु करा आणि बक्कळ पैसा कमवा, जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया
नवी दिल्ली – देशातील ग्रामीण आणि दुर्गम भागांमध्ये बँकिंग आणि डिजिटल सुविधा पुरवण्याच्यादृष्टीने ही कॉमन सर्व्हिस सेंटर सुरु केली जात आहेत. त्यामुळे अनेक तरुणांना रोजगार उपलब्ध झाला आहे. डिजिटल इंडिया अभियानंतर्गत आतापर्यंत देशभरात 4 लाखांहून अधिक CSC सेंटर उघडली गेली आहेत.
या कॉमन सर्व्हिस सेंटर्समुळे सरकारी योजना किंवा इतर कामांसाठी प्रत्येकवेळी सरकारी कार्यालयात धाव घ्यावी लागत नाही. CSC मध्ये शेती, आरोग्य, शिक्षण, बँकिंग आणि आर्थिक सेवा इत्यादी कामे होऊ शकतात. या केंद्रांवर जन्माचा दाखला, पासपोर्ट, आधारकार्ड, पॅनकार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स काढण्याची सुविधा उपलब्ध असते. तुम्ही केवळ दहावी उत्तीर्ण असाल आणि तुम्हाला संगणकाचे ज्ञान असेल तर तुम्ही कॉमन सर्व्हिस सेंटर सुरु करु शकता.
CSC च्या माध्यमातून पैसे कसे कमवाल?
कॉमन सर्व्हिस सेंटरवर होणाऱ्या प्रत्येक व्यवहारासाठी सरकारकडून 11 रुपये दिले जातात. याशिवाय, ट्रेन, विमान, बस तिकीटांच्या बुकिंगवर 10 ते 20 रुपयांची कमाई होते. तसेच एखादे बिल भरण्यासाठी आणि सरकारी योजनांमध्ये नाव नोंदवण्याचे काम कॉमन सर्व्हिस सेंटरवर होऊ शकते.
CSC सुरु करण्यासाठी काय करावे लागेल?
कॉमन सर्व्हिस सेंटर सुरु करण्यासाठी www.csc.gov.in या संकेतस्थळावर नोंदणी करावी लागेल. संकेतस्थळाच्या खालच्या बाजूला असणाऱ्या CSC VLE या पर्यायावर क्लिक करावे. त्यानंतर नवीन पेज ओपन होईल, त्यामध्ये न्यू रजिस्ट्रेशन हा पर्याय निवडावा.