परभणी जिल्ह्यात विक्रमी लसीकरण,प्राथमिक आरोग्य केंद्रांनी मारली बाजी

0 104

परभणी,दि 18 ः
परभणी जिल्ह्यात शनिवार दिनांक 18 सप्टेंबर रोजी विक्रमी असे 23 हजार 413 जणांचे  लसीकरण करण्यात आले आहे.जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. शंकरराव देशमुख यांनी दैनिक शब्दराजशी  बोलताना माहिती दिली आहे.

परभणी जिल्ह्यामध्ये लसीकरणाचा वेग वाढवण्यासाठी जिल्हाधिकारी आंचल गोयल यांच्या सूचनेनुसार शनिवार दिनांक 18 सप्टेंबर रोजी आतापर्यंत झालेल्या लसीकरणापेक्षा उच्चांकी लसीकरणाचा निश्चय करण्यात आला होता.त्यानुसार जिल्हा परिषदेचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.शंकरराव देशमुख यांनी मागील काही दिवसांपासून जय्यत तयारी करत सर्व यंत्रणेला कामाला लावले होते. त्यांचा पाठपुरावा  शनिवारी कामाला आला.परभणी जिल्ह्यात विक्रमी लसीकरण झाले. यामध्ये जिल्हा परिषदेच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात 19 हजार 592, उपजिल्हा रुग्णालयात 2167, आणि परभणी शहर महापालिकेत 1654 असे एकूण 23 हजार 413 जणांचे एकाच दिवशी लसीकरण झाले आहे. डॉ. देशमुख यांनी स्वतः विविध लसीकरण ठिकाणी भेटी देत कर्मचाऱ्यांचे मनोबल वाढवले आहे. नागरिकांनी कोणतीही भीती न बाळगता  लसीकरणासाठी पुढे यावे असे आवाहन डॉ. देशमुख यांनी केले असून या विक्रमासाठी जिल्हाधिकारी आंचल गोयल व  जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शिवानंद टाकसाळे यांचे मार्गदर्शन लाभल्याचे त्यांनी सांगितले.

error: Content is protected !!