विद्यार्थ्यांनी मातीबरोबर नाती जपावी”- कथाकार राजेंद्र गहाळ यांचे प्रतिपादन
परभणी,दि 31 (प्रतिनिधी) :--गंगाखेड येथील श्री. संत जनाबाई महाविद्यालयातील मराठी विभागाकडून दिनांक 29 डिसेंबर रोजी “मराठी वाड्:मय अभ्यास मंडळा “च्या उद्घाटनाचा कार्यक्रम घेण्यात आला.या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून प्रसिद्ध कथाकार व वक्ते राजेंद्र गहाळ उपस्थित होते,तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.. बी.एम. धूत हे होते. प्रमुख उपस्थितीत डॉ. किर्तिकुमार मोरे,(प्रमुख,मराठी विभाग),डॉ. राजेश धनजकर,प्रा. गोरखनाथ धाकपाडे,उपप्राचार्य डॉ.चंद्रकांत सातपुते, डॉ. दयानंद उजळंबे आदींची उपस्थिती होती.
याप्रसंगी बोलताना राजेंद्र गहाळ म्हणाले की,अलीकडच्या काळातील विद्यार्थ्यांनी आपल्या आई वडिलांच्या कष्टाची जाणीव ठेवावी. तसेच शेतात दिवसभर राबराब राबणारा बाप जोपर्यंत विद्यार्थी वर्ग समजून घेणार नाही,तोपर्यंत त्याला कष्टाचे मोल कळणार नाही. ‘बापाच्या पायाचे कुरपं अन मायच्या हातचं खूरपं’हे त्यांच्या काबाडकष्टाचे प्रतीकं असल्याची कबुली सरांनी यावेळी दिली. विद्यार्थी वर्गाने मोबाईलचा वापर कामापुरताच करावा असे आवाहनही त्यांनी यावेळी केले. गहाळ सरांच्या “लगीन पटका”या ग्रामीण शैलीतील कथेने भाषणाचा शेवट झाला. विद्यार्थी वर्गाने यावेळी डोळ्यात प्राण आणून सरांच्या कथेचा मनमुराद आनंद लुटला. अध्यक्षीय समारोप करताना प्राचार्य डॉ. बी. एम. धूत सरांनी कथेच्या निर्मितीची प्रक्रिया उलगडून दाखवली.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु. निकिता लटपटे हिने केले तर प्रास्ताविक नेहा मुंडे हिने केले व आभार कुमारी प्रतीक्षा कांबळे हिने मानले. यावेळी डॉ.अनिल शिंगारे उपप्राचार्य प्रा.भगवान भोसले, डॉ. सतीश डोंगे,डॉ.मनोज इंगोले, डॉ.गजानन भुरके, डॉ.रामविलास लड्डा, डॉ.संजीव कोळपे, डॉ. महावीर हाके,डॉ.सचिन खोकले, प्रा.निवृत्ती भेंडेकर,डॉ.रायठक ,प्रा.सौ.वर्षा भुतडा, प्रा. प्रताप सिसोदे आदींची उपस्थिती होती.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी नेहा मुंडे, प्रिया अवचार,महेक शेख,लोचना भंडारवाडा,मयुरी ढेंबरे,कीर्ती नवघरे या विद्यार्थिनींनी विशेष परिश्रम घेऊन हा कार्यक्रम यशस्वी पार पाडला.