सेलूच्या औदयोगिक वसाहतीचा प्रश्न लागला मार्गी
माजी आमदार हरिभाऊ लहाने यांच्या प्रयत्नाला यश
सेलू ( नारायण पाटील) –
गेल्या कित्येक दिवसापासून रेंगाळत पडलेल्या सेलूच्या औदयोगिक वसाहतीचा प्रश्न मार्गी लागला असून त्वरित याबाबत जमीन संपादनाची कार्यवाही सुरू करावी असे आदेश नुकतेच उद्योगमंत्री उदय सावंत यांनी दिले असल्याची माहिती माजी आमदार हरिभाऊ लहाने यांनी दिली आहे .
एमआयडीसी चा प्रकल्प हा सेलू तालुक्याच्या विकासाची मुहूर्तमेंढ करणारा असेल तसेच हदगाव पावडे परिसरातील जागा ही सर्व दृष्टीने अनकूल आहे. दळणवळण ची साधने उपलब्ध आहे. त्यामुळे हा प्रकल्प इतरत्र कुठेही जाऊ नये यासाठी वेळोवेळी आपण प्रयत्न केले .व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन सविस्तर माहिती दिली होती.
औदयोगिक वसाहत इतरत्र हलवली जाणार अशी सर्वत्र जोरदार चर्चा सुरू होती .परंतु आता या चर्चेला पूर्णविराम मिळाला असून ठरलेल्या जागीच ही औदयोगिक वसाहत होईल व त्वरित याबाबत जमीन संपादन करण्याची कार्यवाही सुरू करण्याचे आदेश उदयोगमंत्री उदय सावंत यांनी दिले आहेत असेही यावेळी लहाने यांनी स्पष्ट केले . आहे .याबाबत एका बैठकीत माजी आमदार हरिभाऊ लहाने यांनी शेतकरी व नागरिकांशी संवाद साधला यावेळी बोलतांना त्यांनी या प्रकल्पातील भूसंपादनासाठी येणाऱ्या अडचणींवर मात करू. व शेतकरी बांधवाशी चर्चा करून त्यांना अपेक्षित मोबदला मिळवून देण्यासाठी आपण प्रयत्न करू. कुठल्याही शेतकरी बांधवावर अन्याय होणार नाही. तर सामोपचारानेच हा प्रश्न मार्गी लावू असे आश्वासन दिले होते .
सेलू एमआयडीसी करिता हादगाव पावडे 95.85 हेक्टर, रवळगाव 212.35 हेक्टर प्रिंपुळा 28.61 हेक्टर असा 245.81 हेक्टर जमिनीवर एमआयडीसीला शासनाची या पूर्वी मंजुरी मिळाली आहे.
असा हा महत्वकांक्षी प्रकल्प सेलू तालुका व परिसरासाठी वरदान ठरणार आहे .असे माजी आमदार हरिभाऊ काका लहाने यांनी एका बैठकीत बोलतांना सांगितले आहे.