श्री शिवाजी महाविद्यालयातील १४ विद्यार्थ्यांना मिळाली नौकरी
परभणी,दि 12 ः
ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना नौकरीची संधी मिळावी म्हणून येथील श्री शिवाजी महाविद्यालयाच्या ट्रेनिंग अँड प्लेसमेंट विभाग आणि एल आर फार्मासिटिकल यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या परिसर मुलाखतीमध्ये विविध पदांसाठी १४ विद्यार्थ्यांची अंतिम निवड करण्यात आली आहे.
परभणी एमआयडीसीतील प्राण्यांसाठी औषध तयार करणाऱ्या फार्मासिटिकल कंपनीच्या वतीने श्री शिवाजी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी विविध पदांच्या भरतीसाठी परिसर मुलाखती आयोजित करण्यात आल्या होत्या. या मुलाखतीसाठी महाविद्यालयातील विविध शाखेतील ७५ विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला होता. त्यापैकी अंतिम यादीत १४ विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली आहे. प्राचार्य डॉ.बाळासाहेब जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सदरील मुलाखतीचे आयोजन करण्यात आले होते. मुलाखती घेण्यासाठी डॉ.सुधीर राजूरकर,डॉ.सौरभ राजूरकर,सिद्धांत राजूरकर,संतोष गाढे, ओंकार देशमुख, नागनाथ नरळदकर, मिलिंद आठवले आदीं उपस्थित होते.
मुलाखतीच्या यशस्वी आयोजनासाठी विभागप्रमुख प्रा.पी.के विभूते, डॉ.गणेश चलिंद्रवार,डॉ.विजय कळमसे,डॉ.शेख एम.ए.,प्रा.एस. एम.सुर्वे आदींनी पुढाकार घेतला.
या यशाबद्दल महाविद्यालय विकास समितीचे प्रमुख हेमंतराव जामकर, प्राचार्य डॉ. बाळासाहेब जाधव, उपप्राचार्य डॉ. श्रीनिवास केशट्टी, उपप्राचार्य डॉ.रोहिदास नितोंडे, गुणवत्ता हमी कक्षाचे प्रमुख डॉ. उत्कर्ष किट्टेकर तसेच महाविद्यालयातील प्राध्यापक, प्रशासकीय कर्मचाऱ्यांनी अभिनंदन केले आहे.