सेलू येथे माकपाची मराठवाडा विभागीय कार्यशाळा

0 74

सेलू ( नारायण पाटील)
मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाची दोन दिवसीय मराठवाडा विभागीय कार्यशाळा सेलूतील सप्तपदी मंगल कार्यालय येथे संपन्न होत आहे. पक्ष बांधणी व सक्षमीकरणासाठी १२ व १३ डिसेंबर रोजी माकपाची ही कार्यशाळा होत आहे. मराठवाड्यातील सर्व जिल्ह्यातील जिल्हा कमिटींचे पहिल्या दिवशी जवळपास 60 प्रमुख कार्यकर्ते उपस्थित आहेत व १३ तारखेला म्हणजेच दुसऱ्या दिवशी एकूण २०० कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत.

या कार्यशाळेला मार्गदर्शन करण्यासाठी राज्याचे सचिव कॉम्रेड उदय नारकर व राज्य सचिव मंडळ सदस्य कॉम्रेड सुनील मालुसरे, कॉम्रेड एम एच शेख आणि कॉम्रेड विजय गाभणे उपस्थित आहेत.कार्यशाळेत मुख्यतः मराठवाड्यातील विकासाच्या अणूशेष शेती व पाणी प्रश्न राज्य देशातील राजकिय परिस्थिती मराठा आरक्षण आंदोलन ई. मुद्यावर चर्चा करून पुढील आंदोलनात्मक दिशा ठरवण्यात येणार आहे या कार्यशाळेचे आयोजन परभणी जिल्ह्याच्या जिल्हा समितीकडून करण्यात आले आहे. कॉम्रेड रामेश्वर पौळ दत्तुसिंग ठाकूर रामकृष्ण शेरे पाटील उध्दव पौळ नशीर शेख दीपक लिपणे अशोक बुरखुंडे रामराजे महाडिक राजु दक्ष सह इतर अनेक कार्यकर्ते परीश्रम घेत आहेत

error: Content is protected !!