गोदानगर जि प शाळेत मातृ- पितृ पूजन उपक्रम संपन्न.

0 42

रामभाऊ आवारे निफाड
गोदानगर  येथे इयत्ता पहिली ते पाचवी पर्यंतची जिल्हा परिषदेच्या शाळेत गुरुवार (दि.01)  मातृ- पितृ पूजन उपक्रम पार पडला.

या उपक्रमासाठी सायखेडा येथील योग प्रशिक्षक ज्ञानेश्वर कुटे यांनी 104 हार, फुले, मिठाई आदी साहित्य स्वखर्चाने दिले. भारतीय संस्कृती प्रमाणे आई व वडिलांची पूजा सर्व विद्यार्थ्यांनी केली त्यानंतर सर्व मुलांची पूजा आई वडिलांनी केली. मुलं आणि आई – वडील यांनी एकमेकांना मिठाई भरवत आणि मिठी मारत हा उपक्रम साजरा करण्यात आला. ज्या विद्यार्थ्यांचे आई – वडील हयात नाहीत किंवा काही कामा निमित्ताने अनुपस्थित होते. त्या सर्व विद्यार्थ्यांसाठी शाळेतील मुख्याध्यापक नवनाथ सुडके, स्मिता लांडे – सुडके, ताईबाई कोकाटे, सोमनाथ महालपुरे हे स्वतः पूजनासाठी बसले आणि या उपक्रमात सहभाग घेतला. या उपक्रमातून आई – वडिल आणि त्यांचे अपत्य यांच्यात आपुलकी, जिव्हाळा, प्रेम,अज्ञाधरकपणा, इत्यादी गुण बालकाच्या अंगी यावेत तसेच पालक, शिक्षक आणि विद्यार्थी यांचा त्रिवेणी संगम झाल्यास विद्यार्थी गुणवंत, ज्ञानवंत होण्यास मदत होते असा या उपक्रमाचा उद्देश असल्याचे मुख्याध्यापक नवनाथ सुडके यांनी नमूद केले. सदरच्या उपक्रमाचे सर्व संचालन ज्ञानेश्वर कुटे आणि त्यांचे सर्व सहकारी विनय पंडित, त्रंबक पवार यांनी केले. उपक्रमास सायखेडा ग्रामपालिका उपसरपंच शोभा डंबाळे, सदस्य माणिक वाघ, अशपाक शेख, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष जालिंदर गांगुर्डे, सतीश वाघ, बंडू गायकवाड, धनेश पवार, कैलास मोहिते,सुनील पवार,शंकर वाघ, माया वाघ, माया पवार, वंदना डंबाळे आदी सदस्य उपस्थित होते.

error: Content is protected !!