विजेचा शॉक लागून माय लेकीचा मृत्यू

0 163

सेलू / प्रतिनिधी – तालुक्यातील रवळगाव येथील माय लेकीचा मृत्यू विजेचा शॉक लागून झाल्याची हृदयद्रावक घटना आज घडली आहे .
तालुक्यातील रवळगाव येथे राहुल अशोक मकासरे ,त्याची पत्नी दीक्षा राहुल मकासरे ( २७),व मुलगी इंदू राहुल मकासरे (१) हे कुटुंब मजुरी करून राहत होते .

 

दि १० /४/२४ बुधवार रोजी सकाळी साडेनऊ चे सुमारास राहुल यांची पत्नी दीक्षा ही आपली मुलगी इंदू हिला अंघोळ घालून तिला काखेत कडेवर घेऊन पाळण्यात झोपवण्यासाठी टेबल फॅन हातात घेऊन जात होती .परंतु अचानकच टेबल फॅन चा इलेक्ट्रिक शॉक लागला व दुर्दैवाने आई व मुलगी दोघीही मरण पावल्या .

 

राहुल मकासरे याच्या खबरीवरून सेलू पोलिसात १५/२४ ,१७४ सीआरपीसी नुसार आकस्मित मृत्यू ची नोंद करण्यात आली असून पुढील तपास पोलीस निरीक्षक दीपक बोरसे यांच्या मार्गदर्शनाखाली पोउनी अशोक जटाळ करीत आहेत .

 

रवळगाव येथे वीज वितरणच्या दलित वस्ती मधील रोहित्रात अर्थींग मध्ये बिघाड झाल्यामुळे घरगुती उपकरणात विदूत प्रवाह उतरत असल्याच्या तक्रारी महावितरण कडे करण्यात आली होती .व याबाबत पोलिसांना देखील कळवले होते .त्यानंतर महावितरण कडून दुरुस्तीचे काम करण्यात आले होते .

 

महावितरणच्या निष्काळजी पणामुळेच माय लेकींना जीव गमवावा लागला असून महावितरण च्या संबंधित अधिकाऱ्यावर सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे .

error: Content is protected !!