श्रीराम जन्मोत्सव समिती सेलू आयोजित शोभायात्राच्या निमंत्रण फेरीस सुरुवात

0 24

सेलू ( नारायण पाटील )
दरवर्षीप्रमाणे याही वर्षी श्रीराम जन्मोत्सव समिती सेलू तर्फे रामनवमीनिमित्त दिनांक 17 एप्रिल बुधवार सकाळी 08 वाजता ग्रामदैवत श्री केशवराज बाबासाहेब मंदिर येथून भव्य दिव्य अशा शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले आहे या शोभायात्रा मध्ये भारतातील विविध ठिकाणातील प्रसिद्ध असे देखावे प्रमुख आकर्षण म्हणून ठेवण्यात आले आहे तरी या शोभायात्रेत सर्वांनी आवर्जून उपस्थित रहावे असे समिती कडून सर्वांना आवाहन करण्यात येत आहे
याबाबत चे निमंत्रण पत्रिका वाटप करण्याचा शुभारंभ आज शिर्डीचे संत व शहराचे ग्रामदैवत केशवराज बाबासाहेब मंदिर मधून करण्यात आले .यावेळी समितीचे सर्व सन्माननीय सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते .

error: Content is protected !!