घनसावंगीच्या गोदापट्यात समीर दुधगावकर यांचे उत्स्फूर्तपणे स्वागत
परभणी,दि 09 ः
परभणी लोकसभा निवडणुकीमध्ये अपक्ष उमेदवार समीर दुधगावकर यांनी आज बुधवारी घनसावंगी तालुक्यात विविध गावात भेटी दिल्या यावेळी दुधगावकर यांचे ग्रामस्थानी उत्स्फूर्तपणे स्वागत केले.
एक उच्चशिक्षित नेतृत्व म्हणून समीर दुधगावकर पुढे आले आहेत.माजी मंत्री,माजी खासदार ऍड गणेशराव दुधगावकर यांचा राजकीय वारसा समर्थपणे पुढे नेणारे समीर दुधगावकर हे परभणी लोकसभेची निवडणूक अपक्ष म्हणून लढवत आहेत. आज बुधवारी घनसावंगी तालुक्यात गेले असता त्यांचे तनवाडी, जिरडगाव,माणगाव पाटोदा, शहागड आदी भागात त्यांचे वाजत गाजत स्वागत करण्यात आले. मराठा आरक्षण युद्धा मनोज जरांगे पाटील यांचे खंदे समर्थक तात्यासाहेब सपाटे, दामोदर दादा शेंडगे, नवनाथ घोणशे, राजेश उगले, कल्याणराव बोराडे, महादेवराव नखाते, बप्पासाहेब खरात, महेंद्र भाऊ पवार, गोरख महाराज आदींच्या भेटी घेतल्या. या भेटीत तीर्थपुरीतील नगराध्यक्ष शैलेंद्र भाऊ पवार, महेंद्र पवार यांनी जाहीर पाठिंबा दिला. ओबीसी नेते गजानन रोडगे यांनी देखील समीर दुधगावकर यांची भेट घेतली.विश्वजीत रत्नपारखे यांनी देखील जाहीर पाठिंबा दिला. या भेटीत प्रा. व्यंकटेश काळे हे देखील उपस्थित होते घनसावंगीच्या गोदापट्ट्यामध्ये समीर दुधगावकर यांचे होणारे स्वागत हे राजकारणाला नवी कलाटणी देणारे ठरणार आहे.