राऊतमारे कुटुंबावर हल्ला करणाऱ्यावर कठोर कारवाईची मागणी- ब्राह्मण समाजाचे निवेदन
परभणी : बीड तालुक्यातील पिंपरगव्हाण येथील अशोक राऊतमारे या ब्राह्मण कुटुंबाच्या घरावर दगडफेक करण्यात आली. तसेच आमच्या पक्षाला मतदान का केले नाही म्हणून राऊतमारे कुटुंबाच्या विरोधात घोषणा देत घरा समोरील वाहनांची तोडफोड करीत कुटुंबातील सर्वांना मारहाण करण्यात आली. या घटनेचा सकल ब्राह्मण समाजाच्या वतीने जाहीर निषेध व्यक्त करण्यात येत आहे. तसेच या प्रकरणातील हल्लेखोर गावगुंडाना तात्काळ अटक करून कठोर कार्यवाही करण्यात यावी. अन्यथा या विरोधात संपूर्ण राज्यभर तीव्र आंदोलन करण्यात असा इशारा सकल ब्राह्मण समाज जिल्हा परभणीच्या वतीने जिल्हा प्रशासनाद्वारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पाठवण्यात आलेल्या निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.
या निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, पिंपरगव्हाण येथील ब्राह्मण कुटुंब राऊतमारे आपला मतदानाचा हक्क बजावून आले. त्यानंतर गावातील काही गुंडप्रवृत्तीच्या लोकांनी आमच्या पक्षाला मतदान का केले नाही म्हणून राऊतमारे यांच्या विरोधात घोषणा बाजी करीत घरावर दगडफेक केली. तसेच कुटुंबातील सर्व व्यक्तींना मारहाण करण्यात आली. एवढ्यावरच न थांबता घरासमोरील वाहनांची तोडफोड करण्यात आली. या घटनेचा सकल ब्राह्मण समाजाच्या वतीने निषेध व्यक्त करण्यात आला. तसेच सदरील हल्लेखोर गावगुंडाना तात्काळ अटक करून कार्यवाही करण्यात यावी अन्यथा ब्राह्मण समाजाच्या वतीने संपूर्ण राज्यभर तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा या निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.
जिल्हा प्रशासना मार्फत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पाठवण्यात आलेल्या निवेदनावर सकल ब्राह्मण समाजाचे परभणी जिल्ह्याचे प्रकाश कौसडीकर, सुरेंद्र नेब, संजय कुलकर्णी, योगेश जोशी, नवनीत पाचपोर, स्वप्निल पिंगळकर, मंदार कुलकर्णी, नंदकुमार पराडकर, संजय वझरकर, पुरूषोत्तम तातोडे, मनोज धर्माधिकारी, सुधाकरगुरू गोळेगावकर, विष्णू वैरागड, गिरीष गावरस्कर, संदिप साळापुरीकर, वैभव असोलेकर, शंकर आजेगावकर, दिपक कुलकर्णी, प्रविण चौधरी, महेंद्र फुटाणे, भरत उपाध्ये, सुरेश जोशी, दिपक कासंडे, श्रीकांत कुलकर्णी, विशाल जोशी, मकरंद मांडे, महेश पारवेकर आदिंच्या स्वाक्षऱ्या आहेत.