अशोकराव काकडे यांच्या वाढदिवसानिमित्त सेलूत मोफत शस्त्रक्रिया शिबीर

२९ रुग्णांवर शस्त्रक्रिया तर दोन रुग्ण संभाजीनगर येथे रेफर

0 35

सेलू / प्रतिनिधी – परभणी जिल्हा परिषदेचे माजी अर्थ व बांधकाम सभापती , बळीराजा संघर्ष समितीचे अध्यक्ष तथा जनसेवा मदत केंद्राचे मार्गदर्शक अशोकराव काकडे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून येथील उपजिल्हारुग्णालयात मोफत शस्त्रक्रिया शिबिराचे आजोजन करण्यात आले होते .सकाळी ८ पासूनच सुरू करण्यात आलेल्या या शिबिरात अँपेंडीक्स ,हर्निया ,स्तनांच्या गाठी ,शरीरातील मासाच्या गाठी तसेच जीभ चिटकने ,हातावरील गाठी ,पाठीच्या मणक्यातील गाठी आदी २९ रुग्णांवर यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आल्या .अंडाशय व एक हर्निया च्या पेशंट साठी जास्तीच्या सुविधांची गरज असल्याने त्यांना संभाजीनगर येथे रेफर करण्यात आले असून तिथे देखील त्यांच्यावर महात्मा ज्योतिबा फुले योजनेतून मोफत शस्त्रक्रिया केली जाणार असल्याची माहिती उपजिल्हारुग्णालयाचे अधीक्षक डॉ जनार्धन गोळेगावकर यांनी दिली .

 

या मोफत शस्त्रक्रिया शिबिराचे उदघाटन दि १३ ऑक्टोबर रोजी माजी आमदार विजयराव भांबळे यांच्या हस्ते करण्यात आले .यावेळी अध्यक्षस्थानी रुग्णालयाचे अधीक्षक डॉ जनार्दन गोळेगावकर ,सत्कार मूर्ती अशोकराव काकडे ,डॉ अरुण बाप्पा रोडगे ,डॉ आलेश बुरेवार, शाफिक अली , दत्तूसिग ठाकूर ,बापूसाहेब मोगल,नियाजभाई ,गौस लाला , संतोष ठाकूर ,सचिन शिंदे ,तौफिक सिद्दिकी ,रफिक भाई ,बाबा भदर्गे,निर्मलताई लिपणे आदींची उपस्थिती होती .

 

 

यावेळी बोलतांना भांबळे यांनी स्पष्ट केले की ,शासनाच्या विविध आरोग्य योजनाचा लाभ केवळ राज्यकर्त्यांच्या दुर्लक्षित कारभारामुळे रुग्णांना मिळत नाही .मतदार संघात आपण सुरू केलेल्या प्राथमिक आरोग्य केंद्राच्या भव्य वास्तू केवळ त्याठिकाणी डॉक्टर ची भरती न झाल्यामुळे शोभेच्या वस्तू बनत आहेत .गोरगरीब जनता लाखो रुपये खर्च करून उपचार घेऊ शकत नाहीत .त्यासाठी त्यांना मोफत उपचार कसा मिळेल यासाठी राष्ट्रवादी नेहमी तत्पर असते .कारण ८०% समाजकारण व २०% राजकारण हेच माननीय शरदचंद्र पवार साहेबांचे धोरण असते .व राज्यात जर महाविकास आघाडी चे सरकार आले तर आरोग्यासाठी प्राधान्य दिले जाईल .असा विश्वास त्यांनी यावेळी बोलून दाखवला .

 

जनसेवा मदत केंद्राच्या माध्यमातून राष्ट्रवादी पक्ष सतत उपजिल्हारुग्णालयात विविध शिबीर घेऊन गरिबांना मोफत उपचार कसे मिळतील यासाठी कार्य करीत आहे .व त्यासाठी या मदत केंद्राचे अध्यक्ष सचिन धापसे व त्यांची सर्व टीम अहोरात्र परिश्रम घेतात .असे प्रतिपादन यावेळी अशोकराव काकडे यांनी केले .
या शिबिरात संभाजीनगर येथील शल्यचिकित्सक डॉ अर्जुन पवार ,जालना येथील डॉ श्रीराम वानखेडे ,नांदेड येथील डॉ राजेश आकुलवार ,डॉ आलेश बुरेवार ,डॉ संतोष चव्हाण ,डॉ आरती गवई यांनी शस्त्रक्रिया केल्या तर सेलूचे डॉ अरुण बाप्पा रोडगे यांनी यावेळी भुलतज्ञ म्हणून जबाबदारी सांभाळली .

 

विकास चव्हाण ,भाग्यश्री त्रिभुवन ,इंद्रजित मगर ,रविता चव्हाण आदींनी त्यांना सहकार्य केले .
या शिबिरात २ अपेंडीक्स ,३ हर्निया ,३ स्तनाच्या गाठी ,५ मासाच्या गाठी यासह इतर शस्त्रक्रिया करण्यात आल्या .
आठ दिवसापासून या मोफत शिबिरासाठी नावं नोंदणी करण्यात येऊन रुग्णांच्या इ सी जी ,रक्त तपासणी या सारख्या आवश्यक त्या प्राथमीक तपासण्या उपजिल्हारुग्णालयात करण्यात आल्या होत्या .व आज आवश्यक त्या रुग्णांवर शिबिरात यशस्वीपणे शस्रक्रिया करण्यात आल्या .

 

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार परवेज सौदागर यांनी मानले .
जनसेवा मदत सेवा केंद्राचे सर्व सन्माननीय सदस्य व रुग्णालयातील कर्मचारी तसेच राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी हे शिबीर यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले .

error: Content is protected !!