युवा संसदेत विद्यार्थ्यांचा आवाज बुलंद

0 3

 

परभणी – म.शि.प्र.मं. श्री शिवाजी विधी महाविद्यालय परभणी येथे नुकतेच युवा संसदेचे आयोजन करण्यात आले. लोकसभा सचिवालयाच्या ‘राष्ट्रीय युवा संसद कार्यक्रम’ अंतर्गत महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी यात उत्साहाने सहभाग नोंदवला.

लोकशाही प्रणालीचा आत्मा असणाऱ्या भारतीय संसदेच्या कामकाजाचा प्रत्यक्ष अनुभव या निमित्ताने विद्यार्थ्यांना अनुभवता आला. संरक्षण, कृषी, महिला सुरक्षा, सामजिक स्वास्थ, कृत्रिम बुद्धिमत्ता, शैक्षणिक धोरण अशा अनेक समस्यांवर विद्यार्थ्यांनी लक्षवेधक प्रश्न मांडले.

येणाऱ्या काळात लोकशाही मधील नागरिकांच्या सक्रिय सहभागासाठी असे कार्यक्रम गरजेचे आहेत, असे मत महाविद्यालयाचे प्राचार्य व्ही. पी. माकणीकर यांनी व्यक्त केले. या अभिनव उपक्रमासाठी महाविद्यालय विकास समितीचे स्थानिक अध्यक्ष चंद्रशेखरजी नखाते यांचे मार्गदर्शन लाभले. श्री. गोविंदराव कदम, मकदुम मोहिउद्दिन, श्री. संतोष बोबडे, ॲड. दिपक देशमुख, ॲड. अशोक शिंदे व श्री. संतोष इंगळे आदींनी या उपक्रमातील सहभागासाठी विद्यार्थ्यांचे कौतुक केले.

error: Content is protected !!