विधानसभा निवडणूुक बाबत मोठी अपडेट.. केंद्रीय निवडणूक आयोगाने घेतली पत्रकार परिषद,सांगीतले…….

0 265

येत्या काही दिवसातच निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होणार आहे. या पार्श्वभू्मीवर केंद्रीय निवडणूक आयोगाने महाराष्ट्र दौरा केल्यानंतर पत्रकार परिषद घेतली. केंद्रीय निवडणूक आयोगाने या पत्रकार परिषदेत सर्वकाही स्पष्ट केलं आहे. तसेच केंद्रीय निवडणूक आयोगाने एक निर्णय घेत उमेदवार आणि राजकीय पक्षांची गोची केली आहे.

दोन दिवसांच्या या दौऱ्यात आयुक्त राजीव कुमार आणि त्यांच्यासोबतच्या शिष्टमंडळाने ११ राजकीय पक्षांसोबत चर्चा केली. यात काँग्रेस, भाजप, शिवसेना शिंदे गट, शिवसेना ठाकरे गट, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट, राष्ट्रवादी शरद पवार गट, मनसे आदी पक्षांचा समावेश होता.या पक्षांनी निवडणुकीसंदर्भात काही सूचना, विनंती केल्या आम्ही त्या ऐकून घेतल्या. दिवाळी सणाचा विचार करून निवडणुकांच्या तारखांचा विचार करावा, अशा सूचना सर्वच पक्षांनी केल्याचे राजीव कुमार म्हणाले.

विधानसभा निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारांना शपथपत्रात त्यांची वैयक्तिक माहिती, गुन्हे दाखल असल्यास त्याबाबतची माहिती, स्थावर आणि जंगम मालमत्तेबाबतची माहिती द्यावी लागते. आता या निवडणुकीत गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या उमेदवारांना त्यांच्या गुन्ह्यांबाबत वृत्तपत्रातून तीनदा माहिती द्यावी लागणार आहे. त्याबाबत माध्यमांमधून माहिती द्यावी लागणार असल्याचं केंद्रीय निवडणूक आयोगाचे मुख्य आयुक्त राजीव कुमार यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केलं.

राजीव कुमार काय म्हणाले?

“गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या उमदेवारांना त्यांच्यावर असलेल्या गुन्ह्याबाबतची माहिती एकूण 3 वेळा वर्तमानपत्र आणि वृत्तवाहिनीतून जाहीरातीद्वारे द्यावी लागेल.आमच्याविरोधात संबंधित गुन्हा असल्याचं सांगावं लागणार आहे. तसेच गु्न्हेगारी पार्श्वभूमी असलेल्यांना उमेदवारी का दिली? याबाबत संबंधित राजकीय पक्षांनाही कारण द्यावं लागणार आहे. तुमच्या मतदारसंघात चांगले उमेदवार नव्हते का? याबाबतही माहिती द्यावी लागेल”, असं राजीव कुमार म्हणाले.

निवडणूक काळात एटीएम व्हॅनला निर्बंध

एटीएमसाठी पैसै घेऊन जाणाऱ्या गाडीला निवडणुक काळात रात्री 6 ते सकाळीं 8 पर्यंत पैसे वाहतूक करता येणारं नाही. याकाळात अँब्युलन्स, बँक आणि पतसंस्थांवर देखील लक्ष ठेवलं जाईल.

या अॅपवर तक्रार करता येणार

निवडणूक आयोगाच्यावतीने सुविधा पोर्टल नावाने अॅप जारी करण्यात आलं आहे. या एप्लिकेशन्सवर मतदारांना तक्रार करता येणार आहे. एखाद्या ठिकाणीं काही घटना घडली किंवा उशीरापर्यंत मतदान सुरु असेल तर केवळ फोटो काढून या एप्लिकेशन्सवर अपलोड केला की, 90 मिनिटांत निवडणुक आयोगाची टीम तिथं पोहचेल, असे निवडणूक अधिकाऱ्यांनी सांगितले.

राज्यातील एकूण मतदारसंघ २८८
> विधानसभेची मुदत २६ नोव्हेंबर रोजी संपणार आहे. त्यामुळे निवणूक प्रक्रिया त्याआधी पूर्ण करावी लागले
> आमचा महाराष्ट्र, आमचे मतदान अशी टॅगलाईन
> १ लाख १८६ हजार मतदान केंद्रे
> ३५० मतदान केंद्रेंवर नवतरुण अधिकारी नियुक्त असतील
> शहरातीस सर्व मतदान केंद्रात सीसीटीव्ही असतील यासाठी प्रयत्न
> ९ कोटी ५९ लाख मतदार-पुरुषांची संख्या ४.५९ कोटी, महिलांच्या संख्या ४.६४ कोटी
> २२ टक्के महिला मतदार वाढले
> ६.३ लाख दिव्यांग मतदार
> १०० वर्षांवरील मतदारांची संख्या ४९ हजार इतकी
> प्रथमच मतदान करणाऱ्या १८ ते १९ वर्षांवरील मतदारांची संख्या १९.४८ लाख इतकी

error: Content is protected !!