खासदार संजय राऊत यांच्यावर गुन्हा दाखल
खासदार संजय राऊत सातत्याने आपल्या भाषणातून विरोधकांवर खरमरीत टीका करतात. प्रत्येकाला ते आपल्या खास शैलीत उत्तरे देतात. अशात राज्य सरकारविरोधात केलेले एक वक्तव्य खासदार संजय राऊतांना चांगलच महागात पडले आहे. या प्रकरणी त्यांच्यावर नाशिक पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
भादवि कलम 505 (1) नुसार गुन्हा दाखल
सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयावर भाष्य करताना संजय राऊत म्हणाले की,शासकीय विश्रामगृहावर दोन दिवसांपूर्वी घेतलेल्या पत्रकार परिषदेत संजय राऊत यांनी, हे सरकार बेकायदेशीर असून या सरकारचे आदेश पाळू नये, अशा प्रकारचे आवाहन केले होते. सरकारी यंत्रणांना केल्याच्या अनुषंगाने पोलिसांनी केला गुन्हा दाखल केला आहे. त्यामुळे या वक्तव्यावरून संजय राऊतांवर कलम 505 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नाशिकच्या मुंबई नाका पोलिस ठाण्यात गुन्हा दखल करण्यात आला आहे.
राऊतांचे वक्तव्य काय?
खासदार संजय राऊत यांनी शनिवारी नाशिकच्या शासकीय विश्रामगृहावर पत्रकार परिषदेत घेतली. यावेळी त्यांनी राज्यातील सत्ता संघर्षावर सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालाच्या अनुषंगाने भाष्य केले. त्यावेळी त्यांनी राज्यातील सरकार हे अपात्र आमदारांच्या भरवशावर असल्याने ते बेकायदेशीर आहे. सर्वोच्च न्यायालयाने ते बेकायदेशीरच ठरवले आहेत. त्यामुळे अशा घटनाबाह्य आणि बेकादेशीर सरकारच्या आदेशांचे पालन करु नये, असा आवाहन केले होते. त्या अनुषंगाने पोलिसांनी हा गुन्हा दाखल केला आहे.