पुर्णेत भारतीय स्टेट बँक व आधार सेवाभावी संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने आरोग्य शिबिर संपन्न

0 139

पुर्णा / सुशिलकुमार दळवी – भारतीय स्टेट बँक शाखा पुर्णा आधार संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक 15 रोजी
आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. स्टेट बँकेच्या आवारात आयोजित आरोग्य शिबिरात बँकेच्या ग्राहकांनी त्यांच्या आरोग्यची तपासणी करून घेतली. हवामान बदल, शरीरास अपायकारक ठरणारी बदलती जीवनशैली, कामाच्या व्याप्तीमुळे निर्माण झालेला तान तनाव आजकाल प्रत्येकजण दुर्लक्ष करीत आहे. प्रत्येकाने आपले आजारी पडू नये म्हणून त्यांचे आरोग्यची तपासणी करून घेतली पाहिजे.

 

 

ताणतणाव दूर करण्यासाठी तसेच नियंत्रित आहाराद्वारे हृदयरोग आणि मधुमेह सारख्या गंभीर आजारांवर नियंत्रण ठेवण्यासाठी योगाची आवश्यकता आहे. असे मत यावेळी भारतीय स्टेट बँकेचे शाखा अधिकारी गोपाळ काठोळे यांनी मांडले. तसेच उद्घाटन प्रसंगी सामाजिक कार्यकर्ते राजू अण्णा एकलारे, उपस्थित होते यावेळी आयोजित शिबिरामध्ये मधुमेह, थायरॉईड, कोलेस्ट्रॉलसह, इतर चाचण्यांसाठी रक्त, नेत्र चिकित्सा, तपासणीसाठी नमुने घेण्यात आले. यावेळी डॉ. तेजस गायकवाड, डॉक्टर सिंग, डॉक्टर दीपक सोनवणे, विक्रांत मोरे, आदींची उपस्थिती होती तसेच यावेळी बँकेच्या ग्राहकांनी आपल्या आरोग्याची तपासणी करून घेतली आहे.

error: Content is protected !!