राजस्थानमध्ये धक्कातंत्र…पहिल्यांदाच आमदार ते थेट मुख्यमंत्री

0 62

छत्तीसगड, मध्य प्रदेश प्रमाणेच भाजपाने राजस्थानमध्ये नेतृत्व बदल केला असून भजनलाल शर्मा यांना नवे मुख्यमंत्री म्हणून निवडले आहे. यामुळे आता वसुंधरा राजे पर्वाचा शेवट झाला का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. ३ डिसेंबर रोजी राजस्थान आणि इतर तीन राज्यांचा विधानसभा निवडणुकांचा निकाल लागला होता. तेव्हापासून मुख्यमंत्रीपदाबाबत कोणताही निर्णय होत नव्हता. त्यानंतर पहिल्यांदा छत्तीसगडचा मुख्यमंत्री ठरवला गेला. तेव्हाच भाजपा वर्तमान नेतृत्वात बदल करण्याच्या मानसिकतेमध्ये असल्याचे निश्चित झाले.
पहिल्यांदाच आमदार म्हणून निवडून आलेल्या भजनलाल शर्मा  यांच्याकडे मुख्यमंत्रीपद सोपवल्यानंतर भाजपने दोन उपमुख्यमंत्रिपदाची निवड केली आहे. मध्य प्रदेश प्रमाणेच राजस्थानमध्येही दोन उपमुख्यमंत्री भाजपने निवडले आहेत. दिया कुमारी  आणि प्रेम चंद बैरवा (हे उपमुख्यमंत्री () असणार आहेत. तर, नव्या विधानसभेच्या अध्यक्षपदासाठी वासूदेव देवनानी यांच्या नावाची घोषणा झाली आहे. भाजपला राजस्थानमध्ये स्पष्ट बहुमत मिळाल्याने अध्यक्षपदासाठी निवडणूक झाल्यास देवनानी यांचा विजय स्पष्ट  आहे.
भाजपच्या विधिमंडळ गटाची आज बैठक पार पडली. यामध्ये मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्रीपदासाठीची नावे जाहीर करण्यात आली. दिया कुमारी या जयपूरचे शेवटचे शासक महाराजा मानसिंग द्वितीय यांच्या नात आहे. 2019 मध्ये दिया कुमारी खासदार होत्या. नंतर पक्षाचा निर्णय मान्य करून त्यांनी विधानसभा निवडणूक लढवली. राजकुमारी दिया कुमारी या विद्याधरनगर या मतदारसंघातून 71 हजार 368 मतांनी विजयी झाल्या आहेत.

भजन लाल शर्मा हे भरतपूर येथील रहिवासी आहेत. ते दीर्घकाळापासून भाजपच्या संघटनात कार्यरत आहेत. प्रदेश सरचिटणीस म्हणून त्यांनी काम पाहिलेय. जयपूरच्या सांगानेरसारख्या सुरक्षित जागेवरून भाजपने त्यांना पहिल्यांदाच निवडणूक लढवायला लावली. विद्यमान आमदार अशोक लाहोटी यांचे तिकीट कापून भजन लाल शर्मा यांना उमेदवारी दिली होती. सांगानेर हा भाजपचा बालेकिल्ला मानला जातो. त्यामुळे भजन लाल शर्मा विजयी झाले. त्यांना 1,45,000  इतकी मते मिळाली होती. भजनलाल यांनी काँग्रेसच्या पुष्पराज भारद्वज यांचा पराभव केला होता. संघटनेतील महत्त्वाच्या भूमिकेसाठी त्यांना मुख्यमंत्रीपद देत भाजपने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

कोण आहेत राजस्थानचे नवे मुख्यमंत्री

56 वर्षीय भजनलाल शर्मा राजस्थानच्या सांगानेर विधानसभा जागेवरुन पहिल्यांदाच निवडून आले. भजनलाल शर्मा ब्राह्मण समाजाचे आहेत. आगामी लोगसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून भाजपने छत्तसगढ, मध्य प्रदेश आणि राजस्थानमधील मुख्यमंत्र्यांची निवड केली आहे. भजनलाल शर्मा मागील अनेक वर्षांपासून भाजपसाठी ग्राऊंड लेव्हलवर काम पाहत होते.

वसुंधरा राजेंना निरोप – 

भजनलाल शर्मा यांच्या रूपाने राजस्थानच्या नव्या मुख्यमंत्र्यांची घोषणा झाली. त्यानंतर आता वसुंधरा राजे यांचं राजस्थानमधील राज्य संपुष्टात आलेय. राजे यांनी दोन वेळा राज्याचे मुख्यमंत्रीपद भूषवले होते. पक्ष मुख्यमंत्रिपदाची कमान नव्या चेहऱ्याकडे सोपवू शकते, असे संकेत भाजपकडून आधीच देण्यात आले होते. त्यामुळे यावेळी वसुंधरा मुख्यमंत्री होणार नाहीत हे निश्चित मानले जात होते.

 

छत्तीसगड, मध्य प्रदेश प्रमाणेच भाजपाने राजस्थानमध्ये नेतृत्व बदल केला असून भजनलाल शर्मा यांना नवे मुख्यमंत्री म्हणून निवडले आहे. यामुळे आता वसुंधरा राजे पर्वाचा शेवट झाला का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. ३ डिसेंबर रोजी राजस्थान आणि इतर तीन राज्यांचा विधानसभा निवडणुकांचा निकाल लागला होता. तेव्हापासून मुख्यमंत्रीपदाबाबत कोणताही निर्णय होत नव्हता. त्यानंतर पहिल्यांदा छत्तीसगडचा मुख्यमंत्री ठरवला गेला. तेव्हाच भाजपा वर्तमान नेतृत्वात बदल करण्याच्या मानसिकतेमध्ये असल्याचे निश्चित झाले.

तिन्ही राज्यात दोन दोन उपमुख्यमंत्री

दरम्यान, छत्तीसगड आणि मध्य प्रदेशप्रमाणे राजस्थानमध्येही भाजपने दोन उपमुख्यमंत्री नियुक्त केले आहेत. दिया कुमारी आणि डॉ. प्रेमचंद बैरवा हे दोन उपमुख्यमंत्री असतील.  डॉ. प्रेमचंद हे दुदू मतदारसंघातून निवडून आले आहेत. तर राजकुमारी दिया कुमारी या विद्याधरनगर या मतदारसंघातून 71 हजार 368 मतांनी विजयी झाल्या आहेत.

राजस्थानमध्ये 199 जागांच्या विधानसभेत झालेल्या निवडणुकीत 115 जागा जिंकून एकहाती सत्ता आणली. तर सत्ताधारी काँग्रेसला 69 जागांवरच विजय मिळवता आला.

राजस्थान पक्षीय बलाबल (Rajasthan Result 2023)

  • भाजप – 115
  • काँग्रेस – 69
  • भारत आदिवासी पक्ष – 3
  • बसपा – 2
  • राष्ट्रीय लोक दल – 1
  • राष्ट्रीय लोकतांत्रिक पार्टी -1
  • अपक्ष – 8
    ———————
    एकूण -199
error: Content is protected !!