महाराष्ट्रानंतर ‘या’ राज्यात ओमायक्रॉनने गेला देशातील दुसरा बळी
राजस्थानमधील उदयपूरमध्ये कोरोनाच्या ओमिक्रॉन या नवीन व्हेरिएंटची लागण झालेल्या 73 वर्षीय व्यक्तीचा शुक्रवारी मृत्यू झाला. देशातील कोरोनाच्या या व्हेरिएंटमुळे हा दुसरा मृत्यू आहे. सीएमएचओ डॉ. दिनेश खराडी म्हणाले की, मृत्यू पोस्ट-कोविड न्यूमोनियामुळे झाला आहे. वृद्धांचा प्रवासाचा इतिहास नव्हता. तसेच 21 आणि 22 डिसेंबर रोजी तपासात ते निगेटिव्ह आले. 25 डिसेंबर रोजी त्यांच्या रिपोर्टमध्ये ओमायक्रॉन व्हेरिएंट असल्याची पुष्टी मिळाली होती.
मात्र 21 डिसेंबर रोजी रुग्ण कोरोना निगेटिव्ह आला होता. 25 डिसेंबर ला रुग्णाला व्हेरिएंटचा ) संसर्ग झाल्याचं स्पष्ट झालं. कोरोनाची लागण झाल्यापासून रुग्ण रुग्णालयात दाखल होता. वैद्यकीय विभाग पोस्ट कोविड न्यूमोनियाचा परिणाम असल्याचं म्हणत आहे. मृत रुग्णाला उच्च रक्तदाब आणि मधुमेहाचाही त्रास होता.
महाराष्ट्रात गुरुवारी तब्बल 198 नवे ओमायक्रॉनबाधित रुग्णांची नोंद झालीय. यापैकी एका रुग्णाच्या मृत्यूचीदेखील नोंद झाली आहे. ज्या रुग्णाच्या मृत्यूची नोंद झालीय खरंतर त्याचं दोन दिवसांपूर्वीच निधन झालंय. त्याचा NIA रिपोर्ट गुरुवारी समोर आला आहे. त्यामध्ये त्याला ओमायक्रॉनची लागण झााली होती, अशी माहिती समोर आली आहे. पण रुग्णालय प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, संबंधित रुग्णाचा मृत्यू हृदय विकाराच्या झटक्याने झाला आहे.पिंपरी चिंचवड महापालिकेकडून याबाबत प्रसिद्धीपत्रक जारी करण्यात आलं आहे. पिंपरी चिंचवड महापालिका हद्दीतील गुरुवारी तीन रुग्णांना एनआयव्ही रिपोर्ट समोर आले आहेत. यामध्ये तीन जणांना ओमायक्रॉनची बाधा झाल्याचं स्पष्ट झालंय. त्यापैकी एकजण हा नायजेरिया येथून आला होता. तर उर्वरित दोन रुग्ण हे त्याचे निकटवर्तीयच असल्याचं समोर आलं आहे. नायजेरिया येथून आलेल्या रुग्णाचा यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालय येथील रुबी एलकेअर कार्डीयाक सेंटर येथे 28 डिसेंबरला हृदय विकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. या रुग्णाचा ओमायक्रॉन पॉझिटिव्ह असल्याचा रिपोर्ट समोर आला. या रुग्णाची ओमायक्रॉनची लागण प्रासंगिक निदान असल्याचं महापालिकेने प्रसिद्धी पत्रकात म्हटलं आहे.