सेलूकरांना दोन दिवस व्याख्यानाची वैचारिक मेजवानी

ग्रंथालय, शब्दसह्याद्री व अक्षर प्रतिष्ठानचा उपक्रम

0 46

 

 

सेलू – येथील स्वामी रामानंद तीर्थ हिंदी-मराठी ग्रंथालय, शब्दसह्याद्री व अक्षर प्रतिष्ठानच्या वतीने सेलूकरांना दोन दिवस व्याख्यानाची वैचारिक मेजवानी मिळणार आहे.

 

स्वामी रामानंद तीर्थ हिंदी-मराठी ग्रंथालयाच्या वतीने मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्या बद्दल रविवार ( दि. १३ ) रोजी ‘ अभिजात मराठी : सांस्कृतिक पार्श्वभूमी आणि भवितव्य ‘ या विषयावर स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेडच्या भाषा संकुल विभागातील प्रा. पी. विठ्ठल यांचे व्याख्यान आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नूतन विद्यालय शिक्षण संस्थेचे सचिव प्राचार्य डॉ. विनायकराव कोठेकर हे असतील.

 

तर शब्दसह्याद्री व अक्षर प्रतिष्ठानच्या वतीने माजी राष्ट्रपती डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांची जयंती वाचन प्रेरणा दिनाच्या निमित्ताने सोमवार ( दि. १४ ) रोजी अक्षर व्याख्यानमालेचे चौथे पुष्प प्रसिद्ध वक्ते प्राचार्य डॉ. सुनीलकुमार लवटे ( कोल्हापूर ) हे ‘ आम्ही भारताचे नागरिक ‘ या विषयावर गुंफणार आहेत. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक सर्जेराव लहाने तर प्रमुख पाहुणे म्हणून प्राचार्य नितीन लोहट ( परभणी ) हे असतील. दोन्ही व्याख्याने नूतन विद्यालयाच्या कै. रा. ब. गिल्डा सभागृहात सायंकाळी सहा वाजता होणार आहेत. व्याख्यानाच्या यशस्वितेसाठी संयोजक प्राचार्य डॉ. शरद कुलकर्णी, महेश खारकर, चंद्रशेखर मुळावेकर, डॉ. सुरेश हिवाळे, डॉ. शरद ठाकर, डॉ. सतीश मगर, मुख्याध्यापक रमेश नखाते, डॉ. काशिनाथ पल्लेवाड, रामराव गायकवाड, रामराव बोबडे, सुभाष मोहकरे परिश्रम घेत आहेत.

error: Content is protected !!