दिग्रस बु येथे सापडला एक अनोळखी वृद्ध महिलेचा मृतदेह

0 463

सेलू / प्रतिनिधी – तालुक्यातील दिग्रस बु येथे शेत गट क्रमांक ४६ मध्ये एका अनोळखी वृद्ध महिलेचा मृतदेह आढळून आला असून याबाबत सेलू पोलिसात आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली आहे .

 

येथील रामकीसन बापूराव बुरे हे दि १३/१०/२४ रोजी सकाळी १० चे सुमारास त्यांचे शेत गट नंबर ४६ मध्ये सोयाबीन ची गुळी गोळा करण्यासाठी गेले असता शेतात धुऱ्याच्या कडेला एका अंदाजे ६० ते ६५ वर्ष वय असलेल्या अनोळखी महिलेचा मृतदेह पडलेला आढळून आला .सदरील महिला ही गावातील नसून तिची ओळख पटत नसल्याने कुठून तरी भीक मागत येऊन शेतात मरण पावली असा अंदाज व्यक्त केला जात आहे .

 

रामकीसन बुरे यांच्या खबरीवरून सेलू पोलिसात कलम १९४ BNSS नुसार आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली आहे .
पोलीस निरीक्षक दिपक बोरसे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उप निरीक्षक देशमुख पुढील तपास करीत आहेत .उपविभागीय पोलीस अधिकारी जीवन बेनिवाल यांच्या सह पोलीस निरीक्षक दिपक बोरसे ,सपोनि कवाळे ,पोउपनी देशमुख यांनी घटनास्थळी भेट दिली आहे .

error: Content is protected !!