जागतिक मानवाधिकार सुरक्षा फेडरेशनमध्ये यशवंत शिरसाठ व ज्ञानेश्वर सोनवणे यांची नियुक्ती

0 137

 

नाशिक – जागतिक मानवाधिकार सुरक्षा फेडरेशनचे राष्ट्रीय अध्यक्ष श्री.राजेंद्र आहेर साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत संत सद्गुरु साईनाथ महाराजांच्या पुण्य पावन भुमी शिर्डी येथे संपन्न झालेल्या बैठकीत जागतिक मानवाधिकार सुरक्षा फेडरेशन दिल्ली (भारत) च्या महाराष्ट्र राज्य अध्यक्षपदी नाशिक जिल्हा परिषदेचे सदस्य यशवंत शिरसाठ यांची नियुक्ती तर फेडरेशनच्या महाराष्ट्र राज्य कार्याध्यक्षपदी संत चरित्र ग्रुपचे महाराष्ट्र राज्य अध्यक्ष ज्ञानेश्वर माऊली सोनवणे यांची नियुक्ती करण्यात आली.

 

कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी शिर्डी येथील ज्ञानदेव आबा गोंदकर हे होते प्रास्ताविकात जागतिक मानवाधिकार सुरक्षा फेडरेशनच्या कार्याचा परिचय महाराष्ट्र राज्य कार्याध्यक्ष ज्ञानेश्वर माऊली सोनवणे यांनी केला. समाजातील गोरगरीब तसेच तळागाळातील वंचित समाज घटकांना योग्य तो न्याय मिळवून देण्यासाठी व मानव अधिकाराचे संरक्षण करण्यासाठी जागतिक मानवाधिकार सुरक्षा फेडरेशनला समाजाच्या सर्व स्तरातील नागरिकांनी फेडरेशनच्या या कार्याला जोडून घ्यावे असे आवाहन यावेळी ज्ञानेश्वर माऊली सोनवणे यांनी केले.
यावेळी महाराष्ट्र राज्य अध्यक्ष यशवंत शिरसाठ यांनी आपले मनोगत व्यक्त करताना फेडरेशनच्या कार्यासाठी आपण पूर्ण वेळ काम करणार असल्याची ग्वाही दिली. या बैठकीत राष्ट्रीय कार्याध्यक्ष म्हणून राम घरत, राष्ट्रीय प्रभारी म्हणून शिर्डी येथील ज्ञानदेव आबा गोंदकर (नंदू आबा) यांची राष्ट्रीय प्रभारी म्हणून तर श्रीभद्रा मारुती देवस्थानचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र जोंधळे यांची महाराष्ट्र राज्य प्रभारी म्हणून निवड जाहीर करण्यात आली. नॅशनल डॉक्टर सेलच्या अध्यक्षपदी डॉक्टर जनार्दन पगार तर महाराष्ट्र राज्य अभियंता सेलच्या अध्यक्षपदी ज्ञानेश्वर मुकादम यांची निवड करण्यात आली. अहमदनगर जिल्हा अध्यक्ष म्हणून घनश्याम म्हस्के तर अ.नगर कार्याध्यक्ष पदी रावसाहेब जगताप, नाशिक जिल्हाध्यक्ष पदी मुस्ताक सरदार, नाशिक शहर महिला अध्यक्ष पदी सौ.सुधा मोरया यांची निवड करण्यात अली.

 

या बैठकीसाठी राष्ट्रीय सचिव ह.भ.प.वाल्मीक महाराज जाधव विदर्भ विभागीय सचिव रामदास धनगावकर राहता तालुका सचिव सचिन डांगे आदी मान्यवर या बैठकीसाठी मोठ्या संख्येने उपस्थित होते शेवटी ज्ञानेश्वर माऊली सोनवणे यांनी आभार मानून राष्ट्रगीताने या बैठकीचा समारोप करण्यात आला.

error: Content is protected !!