संत गजानन महाराजांची पालखी मराठवाड्यात दाखल, 9 जूनला परभणी शहरात
परभणी,दि.05(प्रतिनिधी) : श्री क्षेत्र शेगाव येथील श्री संत गजानन महाराज यांच्या पालखीचे मराठवाड्यात सोमवार (दि.5 जून रोजी हिंगोली च्या पानकनेरगाव येथे आगमन झाले आहे.तर 8 जून रोजी परभणी जिल्ह्यात व 9 जून रोजी परभणी शहरात आगमन होणार आहे.
दरवर्षी प्रमाणे याहीवर्षी श्री संत गजानन महाराज यांच्या पालखीने श्री क्षेत्र शेगाव येथून पंढरपुरकडे प्रस्थान केले आहे. विदर्भातून या पालखीचे 5 जून रोजी पान कन्हेरगाव या ठिकाणी नेहमीप्रमाणे पालखी दाखल झाली आहे. सात जून जवळाबाजार येथे मुक्कामी राहणार आहे. 8 जून रोजी आडगाव रंजेबुवा येथे सकाळी महाप्रसाद घेतल्यानंतर दुपारी निघुन हट्टा मार्गे या पालखीचे श्री क्षेत्र त्रिधारा येथे सायंकाळी आगमन होणार आहे. त्या ठिकाणी मुक्कामानंतर शुक्रवारी 9 जून रोजी पालखी परभणी शहरात दाखल होणार आहे.एकता नगर ,शिवराम नगर येथून ही पालखी मोंढ्यात मुक्कामी थांबणार आहे.शनिवारी 10 जून रोजी पालखी ब्राह्मणगाव, पोखर्णी मार्गे दैठण्यास मुक्कामी थांबणार असून 11 जून रोजी दुपारी खळी तर रात्री गंगाखेड शहरात मुक्कामी थांबणार आहे. तेथून 12 जून रोजी पालखी पुढे बीड जिल्ह्याकडे प्रस्थान करणार आहे.