पूर्णा येथे श्री स्वामी समर्थ सेवा केंद्रात अखंड नाम जप यज्ञ सप्ताह

0 24

श्री स्वामी समर्थ सेवा व आध्यात्मिक बालसंस्कार केंद्र (दिंडोरी प्रणित) अमृत नगर पूर्णा येथे श्री दत्त जयंती निम्मीत दि.20 डिसेंबर पासून अखंड नाम जप यज्ञ सप्ताह व पारायण सोहळा चालू आहे. यामध्ये विविध याग-हवन, श्री गुरुचरित्र सामूहिक पारायण व विविध प्रकारच्या आध्यात्मिक सेवेचे आयोजन करण्यात आले आहे.तसेच दि.26/12/2022 मंगळवार रोजी श्री दत्त जयंती उत्सव दुपारी 12:40 वा. महाआरती सहित मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येणार आहे . यावेळी पूर्णा शहर व पंचक्रोशीतील भाविक सेवेकरी यांना श्री दत्तजन्म उत्सवासाठी उपस्थित राहन्याचे आवाहन करण्यात आले आहे.यावेळी मूळ मराठी संस्कृतीतील विविध प्रकारच्या सण व त्यांचे प्रात्यक्षीके दाखवण्यात येणाऱ आहेत . सप्ताहची सांगता दि. 027/12/2022 बुधवार रोजी सकाळी 10.30 वा. महाआरतीने होणार आहे. यावेळी सप्ताह मोठ्या प्रमाणात साजरा करण्यासाठी सर्व सेवेकरी व भाविक यांनी नियोजन केले आहे .

error: Content is protected !!