मतदार यादीतील नावे कमी करण्याचा प्रयत्न;दोषींवर कारवाईची मागणी-सकल मराठा समाजाचे निवेदन

0 1

सेलू(प्रतिनिधी)दि 16

मतदार यादीतील अनेक नावे वगळल्या गेल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे.ज्या मतदारांनी नावे वगळण्यासाठी अर्ज सुद्धा दिलेला नसतांना त्यांची नावे वगळण्यात आल्याने आणि जी नावे कमी केली आहेत त्यात बहुतांश नावे मराठा समाजाची असल्याने मराठा समाजाने तातडीने ही नावे तातडीने मतदार यादीतुन कमी करू नये अशी मागणी तहसील कार्यालयात आज दि 16 रोजी निवेदनाद्वारे केली आहे।

जिंतूर सेलू मतदार संघातील ज्या मतदाराने लोकसभेला मतदान केले. त्या मतदाराची नावे ७ नंबर चा फोर्म परस्पर दाखल करून हेतू परस्पर मतदार यादीतील नावे कमी करण्याचा प्रयत्न केला जात आहे. ही कमी करण्यात आलेली नावे बहुतांस मराठा समाजाची आहे तरी जी नावे कमी करण्यात आलेली आहे त्यासाठी मतदाराने स्वतः कोणताही अर्ज किंवा ऑनलाइन पद्धतीने कमी करण्यासाठी अर्ज दिलेला नाही.यामुळे प्रशासनाने संपूर्ण प्रकार तपासावा व ही नावे कमी करण्यात येवू नये. तसेच ही नावे कमी करण्यासाठी ज्या BLO ने अर्ज केला आहे त्याची तपासणी करण्यात यावी जर ऑनलाइन पद्धतीने अर्ज करण्यात आला असेल तर तो IP अड्रेस शोधून भारतीय संविधान लोकप्रतीनिधित्व आधिनियम १९५० कलम ३१ नुसार योग्य ती कार्यवाही करण्यात यावी तसेच ही नावे कमी करण्याची प्रक्रिया तत्काळ थांबवावी व ऑनलाइन अर्ज देण्यार्या व्यक्तीचा IP अड्रेस शोधून त्यांच्यावर २४ तासाच्या आत योग्य ती कार्यवाही करण्यात यावी. अन्यथा सकल मराठा समाज सेलू तालुका यांच्या वतीने तहसील कार्यालय समोर बेमुदत आमरण उपोषण करण्याचा इशारा निवेदनात दिला आहे.

error: Content is protected !!