सेलू शहरातील बंद सि. सि. टीव्ही कॅमेरे सुरू करण्याची मागणी
सेलू ( प्रतिनिधी )
मोठा गाजावाजा करून सेलू शहरात नगर परिषदेकडून लावलेले ११ ठिकाणचे सि. सि. टीव्ही कॅमेरे गेल्या अनेक महिन्यापासून बंद आहेत. सदरील बसवण्यात आलेले सि.सि. टिव्ही कॅमेरे सोलार वर चालणारे होते. पण मेंटेनन्स मुळे हे कॅमेरे बंद असून काढून टाकण्यात आले आहेत अशी माहिती समोर आली आहे .
रायगड कॉर्नर, छत्रपती शिवाजी महाराज पुतळा, बस स्थानक, रेल्वे स्टेशन, लोकमान्य टिळक पुतळा, वालूर रोड, क्रांती चौक सेलू येथे हे सि. सि. टीव्ही कॅमेरे बसवण्यात आले होते. हे सगळे ठीकाण गर्दीचे व वर्दळीचे आहेत. पण येथील सि सि टिव्ही काढून नेण्यात आले आहेत. शहरात सि सि टिव्ही कॅमेरे असल्यामुळे शहरात काही अनुचित प्रकार घडला तर त्याच्यावर लक्ष राहण्यास मदत होते. चोरी व गाड्या चोरीचे प्रमाण वाढले आहे त्यावर लक्ष राहु शकते. व इतर काही अनुचित प्रकार होत नाहीत.गैरकृत्य करणाऱ्यांवर नजर राहते. सेलू हे तालुक्याचे ठिकाण असल्यामुळे शहरात सि सि टिव्ही कॅमेरे ची गरज आहे. तरी तात्काळ सेलू शहरातील सि सि टिव्ही कॅमेरे येत्या १५ दिवसात सुरू करण्यात यावे. नसता सेलू वासियांच्या वतीने तिव्र आंदोलन करण्यात येईल. याची नोंद घ्यावी.*
यावेळी जयसिंग शेळके, ॲड. कृष्णा शेरे, गणेश सोळंके, माऊली कदम, सुनील हिवाळे, शुभम खंदारे, जतिन साळवे उपस्थित होते.