दोन दिवसात भूमीका जाहीर करणार-संदिप माटेगावकर
वसमत,दि 08
वसमत विधानसभा मतदार संघात कोणत्या उमेदवारा पाठींबा द्यायचा याचा निर्णय दोन दिवसात जाहीर करण्यात येणार आहे अशी माहीती संदीपभैय्या माटेगावकर मंडळाचे सर्वेसर्वा संदिप माटेगावकर यांनी दिली.
वसमत विधानसभा निवडणुक बाबत संदीप भैय्या माटेगावकर मित्रमंडळाची आढावा बैठक बाराशीव येथे शुक्रवारी पार पडलली.यावेळी श्री.माटेगावकर बोलत होते.
या बैठकीत वसमत विधानसभा निवडणुकीत कोणत्या उमेदवाराला पाठिंबा द्यायचा यावर चर्चा करण्यात आली.करंजाळा जिल्हा परिषद सर्कल मधील विविध गावचे सरपंच, माजी सरपंच, सोसायटीचे चेअरमन आणि कार्यकर्ते यांनी मित्र मंडळाने कोणाला पाठिंबा द्यावा यावर मुक्तपणे चर्चा केली.सर्कल मधील शेती माती ,आरोग्य, जनसुविधा,वीज,पाणी यावर जो उमेदवार लक्ष देऊन पुढील काळात कार्य करील अशा उमेदवाराला पाठींबा देण्याची चर्चा घडून आली.अद्याप कुठल्याही उमेदवाराला पाठिंबा दिला नसून पुढील 2 दिवसात जाहीर भूमिका घेऊन पाठिंबा देऊ असे मित्र मंडळाचे सर्वेसर्वा संदिप माटेगांवकर यांनी सांगितले आहे.
माझ्या मित्र मंडळाच्या पदाधिकाऱ्यांना जो उमेदवार विश्वासात घेऊन कामे करण्याचे आश्वासन देईल त्यांना सहकार्य करू असेही माटेगांवकर यांनी सांगितले.
या बैठकीला कळंबा सरपंच लिंबाजी अंभोरे, अनिरुद्ध कदम,ग्रामपंचायत सदस्य नागेश भालेराव,ग्रामपंचायत सदस्य कृष्णा अंभोरे,निवृत्ती भालेराव,बाजीराव अंभोरे, सोन्ना सरपंच दत्तराव जाधव,लक्ष्मण दशरथे,अंगद गोफणवाड,भानुदास चकोर,सूरज साळवे,सर्जेराव चकोर, शाम अंभोरे,ओमकार राऊत,अंकुश क्षीरसागर,गोविंद अंभोरे,राजू चव्हाण यांच्या सह असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.