रेल्वे विभागाकडून बंपर भरती…

0 62

मुंबई,दि 23 ः
रेल्वे विभागाकडून बंपर भरती प्रक्रियेतून पाच हजारांपेक्षाही अधिक पदे ही शिकाऊ उमेदवारांची भरली जाणार आहेत.रेल्वे रिक्रूटमेंट सेल पश्चिमकडून ही भरती प्रक्रिया राबवली जातंय. विशेष म्हणजे या भरती प्रक्रियेसाठी आपल्याला ऑनलाईन पद्धतीने अर्ज ही करावी लागणार आहेत. चला तर मग जाणून घ्या या भरती प्रक्रियेबद्दल अधिक आणि अर्ज करण्याची प्रक्रिया.
या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया आजपासून सुरू झालीये. शिकाऊ उमेदवारांची 5066 पदे ही भरली जाणार आहेत. rrc-wr.com. या साईटवर जाऊन आपल्याला भरती प्रक्रियेसाठी अर्ज ही करावी लागणार आहेत. येथेच आपल्याला भरती प्रक्रियेची सविस्तर माहिती देखील आरामात मिळेल. विशेष म्हणजे दहावी पास उमेदवारही भरतीसाठी अर्ज करू शकतात.

दहावीमध्ये 50 टक्के गुण भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराला मिळालेले असावेत. उमेदवाराकडे संबंधित ट्रेडमध्ये आयटीआय प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे. या भरती प्रक्रियेसाठी 24 वयोगटापर्यंतचे उमेदवार हे आरामात अर्ज करू शकतात. सरकारी नियमानुसार आरक्षण क्षेणीतील उमेदवारांना वयाच्या अटीमध्ये सूट ही देण्यात आलीये. या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 22 ऑक्टोबर 2024 आहे. त्यापूर्वीच उमेदवारांना भरती प्रक्रियेसाठी अर्ज ही करावी लागणार आहेत. विशेष म्हणजे उमेदवारांना या भरती प्रक्रियेसाठी कोणत्याही प्रकारची परीक्षा ही द्यावी लागणार नाहीये. गुणवत्तेच्या आधारेच उमेदवाराची निवड ही केली जाईल.

उमेदवाराचे दहावीचे मार्क आणि आयटीआयचे मार्क बघून गुणवत्ता यादी तयार केली जाईल. या भरती प्रक्रियेसाठी उमेदवारांना 100 रूपये फीस ही भरावी लागेल. महिलांना फीस भरण्याची गरज नाही. शेवटच्या तारखेच्या अगोदर उमेदवारांनी भरती प्रक्रियेसाठी अर्ज करावीत. अधिसूचनेवर आपल्याला भरती प्रक्रियेची इतर माहिती आरामात मिळेल.

error: Content is protected !!