सामाजिक सुरक्षा सांभाळून उत्साहात नवरात्र महोत्सव साजरा करा-पोलीस निरीक्षक समाधान चवरे

0 113

सेलू,दि 13 ( नारायण पाटील )
सामाजिक सुरक्षिततेची काळजी घेऊन व सामाजिक सलोखा सांभाळून येणारा नवरात्र महोत्सव उत्साहात साजरा करावा .असे आवाहन सेलू पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक समाधान चवरे यांनी नवरात्र महोत्सव निमित्त आयोजित बैठकीत मार्गदर्शन करतांना केले .
१५ ऑक्टोबर पासून होणाऱ्या नवरात्र महोत्सवानिमित्त सर्व नवरात्र महोत्सव पदाधिकाऱ्यांची बैठक सेलू पोलीस स्टेशन मध्ये दि १३/१०/२३ रोजी घेण्यात आली .यावेळी सेलू उपविभागाचे पोलीस उपविभागीय अधिकारी सुनील ओव्हळ यांची प्रमुख उपस्थिती होती .
यावेळी बोलतांना चवरे पुढे म्हणाले की ,शहरात नवरात्र महोत्सवाचे मंडप उभे करतांना रहदारीला कसल्याही प्रकारचा अडथळा निर्माण होणार नाही याची पुरेपूर काळजी घ्यावी . तसेच यामध्ये डी जे चा वापर टाळावा व महोत्सवातील लाऊडस्पीकर चा आवाज देखील मर्यादित ठेऊन रात्री दहा पर्यंतच करावा .पारंपरिक पद्धतीने व समाज प्रबोधनाचे कार्यक्रम घेण्यासाठी प्रयत्न करावेत .दांडिया मध्ये फक्त मुली व महिलांचाच सहभाग असावा म्हणजे वाद होणार नाहीत .पोलीस बंदोबस्त असेलच परंतु महोत्सव समितीच्या वतीने स्वयंसेवकाची देखील नेमणूक करावी .
शासकीय नियम पाळून व कोणासही त्रास होणार नाही याची काळजी घेऊन उत्साहात नवरात्र महोत्सव साजरा करावा .असे आवाहन केले .
यावेळी शहरातील नवरात्र महोत्सवाचे पदाधिकारी ,पत्रकार व पोलीस पाटील यांची उपस्थिती होती .

error: Content is protected !!