रात्री फिरणाऱ्या संशयित ड्रोन मुळे नागरिक भयभीत
सेलू ( नारायण पाटील )
तालुक्यातील ग्रामीण भागात रात्री फिरणाऱ्या संशयित ड्रोन मुळे ग्रामस्थांत भीतीचे वातावरण पसरत असून प्रशासनाने याबद्दल त्वरित चौकशी करून जनतेला योग्य ती माहिती द्यावी अशी मागणी ग्रामस्थांमधून होत आहे .
गेल्या कांही दिवसांपासून तालुक्यातील डासाळा सर्कल मध्ये देऊळगाव गात ,डासाळा ,रवळगाव परिसरात रात्रीचे वेळी असे चार ते पांच संशयित ड्रोन गावावर फिरतांना आढळून आले आहेत .परंतु या ड्रोन चा उद्देश कळू न शकल्यामुळे नागरिकांत भीतीचे वातावरण पसरत आहे .कांही दिवसांपूर्वी देऊळगाव गात येथे मोठ्या प्रमाणावर झालेल्या घरफोड्या मुळे या ड्रोन द्वारे कांही रेकी तर केली जात नाही ना .असा संभ्रम नागरिक व्यक्त करीत आहेत .नेमका हा प्रकार काय आहे .याबाबत उलट सुलट चर्चा देखील होत आहे .एखादा हल्ल्याचा तर हा प्रकार नाही ना असेही बोलले जात आहे .याबाबत लवकरच पोलीस प्रशासनाकडे लेखी तक्रार देखील करण्यात येणार आहे .
नेमका हा प्रकार काय आहे याबाबत प्रशासनाने त्वरित चौकशी करून सत्य जनतेसमोर मांडावे म्हणजे त्यांची भीती कमी होईल .अशी मागणी जनतेमधून केली जात आहे