महापुरुषांची कुळे त्यांच्या देहाने नाही तर ध्येयाने चालत असतात-किशोरजी व्यास

0 1

 

सेलू / नारायण पाटील – महापुरुषांची कुळे त्यांच्या देहाने नाही तर ध्येयाने पुढे चालत असतात .जीवाला जन्म घेण्यासाठी योग्य गर्भ व योग्य कुळाची गरज असते .असे प्रतिपादन गोविंददेव गिरीजी महाराज यांनी येथील हनुमानगड येथे आयोजित रामकथेत प्रभुरामचंद्र यांच्या जन्माची माहिती देतांना केले .

 

सेलू येथील नूतन विद्यालयाच्या ‘हनुमानगढ’ परिसरात बिहाणी कुटुंबियांच्या वतीने आयोजित श्रीराम कथेच्या दुसऱ्या दिवशी स्वामीजी बोलत होते.

स्वामीजी हनुमानगढ परिसरात आल्यानंतर श्री दक्षिणमुखी हनुमान मंदीरात जाऊन दर्शन घेतले; तसेच छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. गोमातेचे पूजन करून कथास्थळी आले. सावित्रीबाई बद्रिनारायणजी बिहाणी यांच्यासह बिहाणी कुटुंबियांच्या वतीने स्वामीजींचे यथोचित स्वागत करण्यात आले. प्रभु श्रीराम यांच्या आरतीनंतर कथेला सुरुवात झाली .यावेळी बोलतांना स्वामीजी म्हणाले की; संपत्तीची शुद्धता ज्या घरात असते त्याच घरात राम जन्माला येत असतात .राज्य सुंदर ,समृद्ध व सुरक्षित असणे ही काळाची गरज असते .व तशी अयोध्या होती .पापांचे क्षालन होऊन महान कार्य सिद्धीस जायचे असेल तर महान तपाची आवश्यकता असते .व तसे तप श्रीरामाचे पिता राजा दशरथ यांनी केले होते . अश्वमेध व पुत्रकामेष्ठी यज्ञाचे फलस्वरूप दशरथाला प्रभू रामचंद्र ,भरत ,लक्ष्मण व शत्रुघ्न अशी चार मुले झाली .

 

प्रभुरामचंद्रांनी अधिकारपेक्षा कर्तव्य महत्वाचे मानले होते .त्यामुळे अधिकाराची लढाई करीत बसण्यापेक्षा वडिलांचे वचन पाळणे हे कर्तव्य समजून १४ वर्ष वनवासात गेले होते .
अधिकाराच्या त्यागाला तिलांजली देऊन कर्तव्य पालनाची बंधू प्रेमाची लढाई म्हणजेच रामकथा आहे .रामाने वनवासात सर्व गोष्टींचा त्याग केला परंतु प्रतिकाराचे प्रतीक असलेला धनुष्यबाण नेहमी त्यांनी जवळ ठेवला .
यावेळी स्वामींनी सुर्यवंशीय कुळातील दिलीप ,रघु ,अज व दशरथ यांची थोडक्यात माहिती दिली .राजा दिलीप ने केलेली गो मातेची सेवा आजही अविस्मरणीय आहे .

 

ओम हे वितळलेले परब्रह्म तत्व आहे तर राम हे थिजलेले परब्रम्ह तत्व आहे .व थिजलेल्या ब्रम्हत्वातच खरा आनंद असल्याचे स्वामीजींनी यावेळी उदाहरणादाखल सांगितले .
रामाने आचरणात जेवढे नियम पाळले तेवढेच नियम भरताने देखील पाळले आहेत . भक्ती मध्ये अनुभूती येण्यासाठी भरताचे जीवन हे गुरुकिल्लीच आहे
जीवनात भरतत्व आले की रामत्व आपोआप येते .
सेवा कशी करावी याचा जगातील सर्वोच्य आदर्श म्हणजे लक्ष्मण आहे .कारण रामाच्या दिव्य पराक्रमाच्या पताका ची काठीच लक्ष्मण आहे .ज्याच्या केवळ समरणाने शत्रू नष्ट होतो तो शत्रूग्न .राम व लक्ष्मण वनात व भरत नंदीग्राम मध्ये असताना १४ वर्ष भरतानेच अयोध्येची व्यवस्था व सुरक्षा सांभाळली .मंदिराच्या पायातील दगड दिसत नसतात परंतु त्यावरच मंदिर उभे असते .तसेच शत्रुघ्न हाच रामकथेचा व अयोध्येच्या विकासाचा पाया आहे .असेही स्वामीनी यावेळी सांगितले .
भारतीय स्वातंत्र्याचे मंदिर देखील असेच अनेक देशभक्त व हुतात्म्यांच्या बलिदानावर उभे आहे .केवळ चरखा चालवुन देशाला स्वातंत्र्य मिळाले नाही तर त्यामागे हुतात्म्यांचे बलिदान व आझाद हिंद सेनेची कामगिरी देखील महत्वाची आहे .परंतु सध्या खोटा इतिहास शिकवला जात आहे .विनायक दामोदर सावरकर यांच्या संपूर्ण कुटूंबाची स्वातंत्र्यासाठी पुर्णपणे धूळधान झाली .परंतु अजूनही देशात त्यांचा पाहिजे तेवढा सन्मान होत नाही .व आपली घरे भरणाऱ्या भामट्यांचा सन्मान होतो .ही एक शोकांतिकाच म्हणावी लागेल .
खऱ्या अर्थाने देशाचे भवितव्य घडवायचे असेल तर छत्रपती शिवाजीमहाराजांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवणे गरजेचे आहे .भारतीय शिक्षण संस्कृती ही जगातील सर्वोत्तम शिक्षण संस्कृती आहे .परंतु पाश्चिमात्य शिक्षण प्रणालीचा स्वीकार करून सर्व बट्याबोळ झालेला आहे .सध्या सर्वत्र फॅशन च्या नावाखाली अंगप्रदर्शन करणे चालू आहे .आईच आपल्या मुलींना निर्लज बनवत आहेत .त्यासाठी आईला संस्कार देणं हीच काळाची गरज ठरत आहे .भारतीय वस्त्र परिधान न केलेल्या महिलांना माझ्या व्यासपीठावर मी प्रवेश देत नाही .असेही स्वामींनी यावेळी स्पष्ट केले .
आजची राम कथा तिरुपती बालाजी धामात असल्याने बालाजीची अतिशय सुंदर व मनमोहक मूर्ती व्यासपीठावर ठेवण्यात आली होती .यासाठी रवी मुळावेकर ,शशिकांत देशपांडे, रवी कुलकर्णी व भालचंद्र गांजापुरकर यांनी सहकार्य केले .कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ह भ प प्रा .संजय पिंपळगावकर व लिंबेकर सर यांनी केले .शेवटी सामूहिक आरतीने आजच्या कथेची सांगता करण्यात आली .

error: Content is protected !!