बनवेगिरीचा शेवट… वादग्रस्त प्रशिक्षणार्थी IAS अधिकारी पूजा खेडकर यांची उमेदवारी रद्द

0 17

गेल्या महिन्याभरापासून चर्चेत असणाऱ्या पूजा खेडकर यांची उमेदवारी UPSC नं अखेर रद्द केली आहे. आधी पुणे जिल्हाधिकारी कार्यालयाील गैरवर्तन व त्यानंतर कागदपत्रांमध्ये आढळलेली कथित अनियमितता या पार्श्वभूमीवर पूजा खेडकर यांची उमेदवारी यूपीएससीनं रद्द केल्याचं वृत्त एएनआयनं दिलं आहे. विशेष म्हणजे यापुढे यूपीएससीकडून घेण्यात येणाऱ्या कोणत्याही परीक्षेमध्ये पूजा खेडकर यांना बसता येणार नाही, असंही यूपीएससीकडून स्पष्ट करण्यात आलं आहे. पूजा खेडकर यांच्यासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे. एकीकडे यूपाएससीनं त्यांच्यावर ही कारवाई केलेली असताना दुसरीकडे पूजा खेडकर यांच्या अटकपूर्व जामीन अर्जावर अद्याप पतियाला कोर्टानं निर्णय दिलेला नाही.

आयएएस पद काढून घेतलं

यूपीएससीने एखाद्याचं आयएएस पद काढून घेणं हे दुर्मिळातील दुर्मिळ प्रकरण. यासाठी यूपीएससीने गेल्या 15 वर्षांतील, 2009 ते 2015 या दरम्यानच्या सर्व दिव्यांग प्रमाणपत्रांची छानणी केली. यामध्ये 14,999 उमेदवारांचे प्रमाणपत्र योग्य ठरलं आणि एकट्या पूजा खेडकरचे प्रमाणपत्र बनावट निघालं. पूजा खेडकरने कलेक्टर होण्यासाठी यूपीएससीलाही गंडवलं. तिने स्वतःचं नाव तर बदललंच, पण आई-वडिलांच्या स्पेलिंगमध्ये बदल करून फसवणूक केली. त्यामुळेच पूजा खेडकरांनी नेमके किती वेळा परीक्षा दिली हे यूपीएससीलाही समजत नव्हते.

नाव बदलून अनेकवेळा परीक्षा दिली

पूजा खेडकर प्रकरणासंबंधी UPSC ने 2009 ते 2023 पर्यंत म्हणजेच मागील 15 वर्षात CSE च्या अंतिम शिफारस केलेल्या 15,000 उमेदवारांची माहिती तपासली. त्यामध्ये पूजा खेडकर वगळता इतर कोणत्याही उमेदवाराने यूपीएससीच्या नियमानुसार परीक्षेच्या दिलेल्या प्रयत्नांपेक्षा जास्त प्रयत्न दिल्याचं समोर आलं नाही.

पूजा खेडकरने स्वतःचं नाव बदललं. पूजा दिलीप खेडकर, पूजा दिलीपराव खेडकर, पूजा मनोरमा दिलीप खेडकर अशा विविध नावांनी तिने परीक्षा दिल्या. एका ठिकाणी तिने वडिलांचं नाव हे दिलीपराव खेडकर असं लिहिलं तर त्यानंतरच्या प्रकरणात तिने वडिलांचं नाव दिलीप खेडकर असं नोंदवल्याचं समोर आलं. पुन्हा तिने आईचेही नाव जोडत परीक्षेसाठी नावं नोंदवल्याचं समोर आलं आहे.

कालच पुणे पोलिसांनी पूजा खेडकर यांचा मोबाईल गेल्या ८ दिवसांपासून नॉट रिचेबल असल्याचे म्हटले होते. पुण्यात पूजा खेडकर यांनी केलेल्या प्रतापामुळे त्यांची वाशिमला बदली करण्यात आली होती. त्यानंतर जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांनी त्यांच्याविरुद्ध पुणे पोलिसात तक्रार दाखल केली. या संदर्भात पुणे पोलिसांनी गुन्हा दाखल करत पूजा खेडकर यांना ३ वेळा समान्स काढला होता. मात्र तरी त्या पोलिसांसमोर हजर झाल्या नाहीत.

खेडकर कुटुंबातील फक्त पूजा खेडकर नाही तर त्यांची आई मनोरमा खेडकर आणि वडील दिलीप खेडकर हे देखील चर्चे आले आहेत. आई मनोरमा यांनी पिस्तूल दाखवून शेतकऱ्यांना धमकावल्या प्रकरणी त्यांना पोलिसांनी अटक केली आहे. सध्या त्या पोलिस कोठडीत आहेत. तर वडील दिलीप खेडकर यांनी बारामतीत नाव बदलून जमीन खरेदी केल्याचे प्रकरण समोर आले आहे. आता या प्रकरणी दिलीप खेडकर यांच्यावर देखील कारवाई होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

error: Content is protected !!