पशुसंवर्धनाच्या वैयक्तिक लाभाच्या योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करण्याचे विभागाचे आवाहन.
कंधार,दि 05 (प्रतिनिधी)ः
ग्रामीण भागातील सुशिक्षित बेरोजगार युवकसह पशुपालक व शेतकरी बांधवांना स्वयंरोजगाराचे साधन उपलब्ध करून त्यांना शाश्वत अर्थार्जनाचा पर्याय उपलब्ध करून देणारा पशुसंवर्धन विभागांतर्गत विविध वैयक्तिक लाभाच्या योजनेसाठी अर्ज करण्याचे आवाहन पशुसंवर्धन विभागाने केले आहे.
आपण ऑनलाइन अर्ज भरण्यासाठी संकेतस्थळ https://ah.mahabms.com व अँड्रॉइड मोबाइल आपलिकेशन चे नाव AH-MAHABMS(गुगल प्ले स्टोअरवर उपलब्ध) उपलब्ध असून या ॲप्स च्या माध्यमातून आपण अर्ज करू शकता. अर्ज करण्याचा कालावधी 4 डिसेंबर 2021 ते 18 डिसेंबर 2021 असणार आहे आपल्याला काही अडचणी आल्यास टोल फ्री क्रमांक 1962 किंवा 1800 233 0418 क्रमांकावर अधिक माहिती घेता येणार आहे
नवीन पुर्ण राज्यस्तरीय व जिल्हास्तरीय योजनेअंतर्गत दुधाळ गाई म्हशीचे गट वाटप करणे, शेळी मेंढी गट वाटप करणे ,1000 मांसल कुकुट पक्षाचा संगोपनासाठी निवारा शेड उभारण्यासाठी अर्थ सहाय्य देणे, 100 कुक्कुट पिल्लांचे गट वाटप व 25 अधिक 3 तलंगा गट वाटप या योजनेसाठी सन 2021-22 या वर्षात भरण्याची निवड प्रक्रिया ऑनलाइन पद्धतीने राबवली जाणार आहे यामध्ये शासनाने अर्जदारास एखाद्या योजनेकरिता अर्ज केल्यानंतर त्यात दर वर्षी पुन्हा अर्ज करावे लागू नयेत यासाठी तयार केलेली प्रतीक्षा यादी पुढील पाच वर्षापर्यंत लागू ठेवण्याची सोय केली आहे. त्यासाठी अर्जदाराने योजनेअंतर्गत आपला मोबाईल क्रमांक बदलू नये असे आवाहन पशुसंवर्धन विभागामार्फत करण्यात येत आहे. आणि जास्तीत जास्त पशुपालक बेरोजगार युवक महिला यांनी ऑनलाइन अर्ज करावे असे पशुसंवर्धन विभागामार्फत आवाहन करण्यात येत आहे.