मानवतला बुधवारी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची सभा
परभणी,दि 11 ः
पाथरी विधानसभा मतदारसंघाचे महायुतीचे राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार आ. राजेश विटेकर यांच्या प्रचारार्थ राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची विजयी संकल्प सभा मानवत येथील राघवेंद्र इस्टेट येथे बुधवार दिनांक 13 नोव्हेंबर रोजी आयोजित करण्यात आली आहे.
महायुतीचे उमेदवार राजेश विटेकर यांना दररोज प्रतिसाद वाढत आहे.विविध गावात प्रचार बैठकांना वेग आला आहे,कार्यकर्ते,पदाधिकारी,नागरीक विटेकर यांच्या विजयासाठी पुढाकार घेत आहेत.अजित दादा पवार यांचे खास विश्वासू असलेले आमदार विटेकर यांच्या विजयासाठी स्वतः अजित पवार सभा घेत आहेत. राघवेंद्र इस्टेट येथे बुधवार दिनांक 13 नोव्हेंबर रोजी सकाळी 11 वाजता होणाऱ्या सभेस मततदार संघातील महायुतीच्या सर्व घटक पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी उपस्थित राहावे असे आवाहन करण्यात आले आहे.