वृक्षदिंडी व ग्रंथदिंडी चे आयोजन करुन वृक्षसंवर्धनाचा व वाचनाचा निर्धार
जि.प.प्रा.शा.कातनेश्वर शाळेचा संस्कारक्षम उपक्रम
पूर्णा, प्रतिनिधी – कातनेश्वर ता.पुर्णा येथील जिल्हा परिषद शाळेच्या वतीने पर्यावरणाचे संवर्धन व वाचनाची आवड निर्माण व्हावी म्हणून वृक्षदिंडी व ग्रंथदिंडी चे आयोजन करुन जनजागृती करण्यात आली.सर्वप्रथम गावातून वृक्षदिंडी व ग्रंथदिंडी काढण्यात आली.फुले,रोपे व पुस्तकांनी सजलेली पालखी,विद्यार्थ्यांनी केलेली विविध प्रकारची पारंपरिक वेशभूषा, कलश, घोषणा फलक व लेझीमच्या गजरात निघालेली मिरवणूक सर्वांचे लक्ष वेधून घेत होती.विद्यार्थ्यांनी वुक्षरोपण, वृक्षसंवर्धन व वाचन करण्याचा निर्धार केला.यावेळी उपस्थितांनी टाळ व मृदूंगाच्या तालावर फुगड्या खेळून कार्यक्रमाचा आनंद लुटला.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सरपंच प्रदीप चापके,उपसरपंच रामेश्वर चापके,ग्रामपंचायत सदस्य बापूराव चापके, अंबादास चापके,शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्रीकांत चापके,उपाध्यक्ष गजानन चापके, शाळेचे मुख्याध्यापक गंगाधर सोनाळे यांच्या मार्गदर्शनाखाली मृदूंगाचार्य हरिओम चापके व शाळेतील शिक्षक दामोधर आव्हाड,संजय खंडाळकर,नागनाथ पांचाळ,बालासाहेब मोरे,राजू पांचाळ,मेघा चेपुरवार,भाग्यश्री अंबटवार,राधिका गुडेवार,ऋतुजा भुसारे यांनी परिश्रम घेतले.