काळजी करु नका,सरकार पूर्णपणे पाठीशी-कृषिमंत्री धनजंय मुंडे

0 2

परभणी,दि 04 ः
आलेल संकट मोठ आहे,त्याला आपण धिरान तोंड दिल पाहीजे, राज्य सरकार हे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या पाठीशी असून शेतकऱ्यांनी काळजी करू नये, झालेल्या नुकसानीचा पूर्णपणे मोबदला मदतीच्या स्वरूपात राज्य शासनाकडून मिळेल, असा शब्द कृषि मंत्री धनंजय मुंडे यांनी परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दिला.

परभणी जिल्ह्यात तीन दिवस अतिवृष्टीने शेतीपिकांचे अतोनात नुकसान झाले आहे.या नुकसानीची पाहणी करण्यासाठी कृषि मंत्री धनंजय मुंडे हे परभणी जिल्ह्यात बुधवार दिनांक चार सप्टेंबर रोजी आले असता त्यांनी काष्टगाव, एकुरुखा,पिंपळगाव ता.परभणी,कोल्हा ता.मानवत,बोरगव्हाण,रेणापूर ता.पाथरी, ढेंगली पिंपळगाव ता.सेलू आदी गावांमध्ये भेटी देऊन नुकसानीची पाहणी केली.यावेळी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेश प्रवक्ते आमदार राजेशदादा विटेकर,मा.आ.डॉ.मधुसूदन केंद्रे, मिथिलेश केंद्रे,पाथरी बाजार समितीचे सभापती अनिल नखाते,राष्ट्रवादी कॉंग्रेस महिला आघाडीच्या अध्यक्षा भावनाताई नखाते यांसह महसूल, कृषी व विमा कंपनीचे अधिकारी आदी उपस्थित होते.यावेळी बोलताना  धनंजय मुंडे यांनी परभणीचे जिल्हाधिकारी यांच्यासह कृषी विभागाचे अधिकारी आदींना तात्काळ पंचनामे सुरू करून मदतीचे अहवाल राज्य शासनाकडे शक्य तितक्या लवकर पाठवावेत असे निर्देश दिले आहेत.पावसाच्या अतिप्रवाहाने तसेच नदीतील प्रवाहाचे पाणी शेत जमिनींमध्ये घुसल्यामुळे बऱ्याच ठिकाणी शेतकऱ्यांच्या जमिनी मधील माती पूर्णपणे खरडून गेली आहे त्याही ठिकाणी शेतकऱ्यांना पूर्णपणे मदत दिली जाईल असेही आश्वासन धनंजय मुंडे यांनी दिले.
तर यावेळी  आ.राजेश विटेकर यांनी शेतकऱ्यांसोेबत संवाद साधत आपुलकीने विचारपुस करत काळजी करु नका,आम्ही या संकटात सोबत आहोत,जिल्ह्यातील नुकसानीची माहीती मुख्यमंत्री,दोन्ही उपमुख्यमंत्री यांना भेटुन दिली आहे.त्यामुळे जिल्ह्यातील एकही नुकसानग्रस्त शेतकरी मदतीपासुन वंचित राहणार नाही याची काळजी घेतली जाईल असे सांगीततले.
कृषिमंत्री मुंडे,आ.विटेकर गहिवरले
जिल्ह्यात नुकसानीची पाहणी करताना अनेक शेतकऱ्यांशी कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी संवाद साधला.त्यांच्याशी आस्थेवाईकपणे विचारपुस करताना अनेक शेतकऱ्यांच्या डोळ्यातील अश्रु पाहुन श्री.मुंडे व आ.विटेकर  हे देखील गहिवरले.

error: Content is protected !!