परभणीसह तीन जिल्ह्यात भूकंपाचे धक्के; रामेश्वर तांडा भूकंपाचे केंद्र
परभणी/प्रतिनिधी – परभणी हिंगोली नांदेड जिल्ह्याला
गुरुवारी (दि.२१) सकाळी सहा वाजून आठ मिनिटानंतर भूकंपाचे दोन धक्के बसले आहेत.4.5 रिश्टर स्केलचा भूकंप झाल्याची नोंद राष्ट्रीय भूकंप मापन यंत्रणेवर दिसुन आली. हिंगोली जिल्ह्य़ातील वसमत तालुक्यात असलेल्या कुरुंदा व दांडेगावच्या उत्तर भागातील रामेश्वर तांड्याच्या उत्तर भागात भूकंपाचे केंद्र असल्याचे दिसून आले. याची खोली 10 किलोमीटर असल्याचे स्पष्ट झाले आहे.
लगेचच दुसरा हलका धक्का पहिल्या धक्क्यानंतर अकरा मिनिटांनी म्हणजे सकाळी 06:19:05 वाजता 3.6 रिश्टर स्केल चा भूकंप झाल्याची नोंद राष्ट्रीय भूकंप मापण यंत्रणेवर दिसुन आली. हिंगोली जिल्ह्यात हे भूकंपाचे केंद्र असल्याचे भूकंपमापन यंत्रणेत दिसून आले. त्यामुळे हिंगोलीसह नांदेड व परभणी जिल्ह्यातही नागरिकांना भूकंपाचा सौम्य धक्का जाणवला. सकाळी फिरायला जाणाऱ्यांना एक-दोन सेकंद जमीन हलल्याचे जाणवले. अनेकांना तसा भास आपल्याला झाल्याचे वाटले. त्यानंतर एक दुसऱ्याला विचारणा केल्यानंतर हा भूकंप असल्याचे स्पष्ट झाले.
आज सकाळी ०६.०८ व ०६.०९ वाजेदरम्यान हिंगोली, वसमत, औंढा व कळमनुरी तालुक्यातील काही गावांमध्ये भूगर्भातुन आवाज व सौम्य धक्के जाणवले आहेत. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाचे रोहित कंजे यांनी दिलेल्या माहितीनुसार जीवित वा वित्तहानी झाली नाही.