विधान परिषदेच्या 11 जागांसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर,आ.दुर्राणी होणार निवृत्त
लोकसभा निवडणुका झाल्यानंतर काही महिन्यांनी महाराष्ट्रात विधानसभेच्या निवडणुका होतात. चालू विधानसभेची मुदत याच वर्षी संपणार आहे. सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये विधानसभेच्या निवडणुका लागू शकतात. पण त्याआधी विधान परिषदेची निवडणूक होणार आहे. विधान परिषदेचे 11 सदस्य पुढच्या महिन्यात निवृत्त होणार आहेत. विधान परिषद निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. विधान परिषदेवर आता सर्वच पक्षांकडून कोणाला संधी मिळते? याची उत्सुक्ता आहे.परभणीतील आमदार बाबाजानी दुर्राणी हे निवृत होत आहेत.परभणीतून राजेश विटेकर यांनी संधी मिळणार आहे.त्यामुळे दुर्राणी यांच्याबाबत पक्ष कोणता निर्णय घेतो याकडे लक्ष लागले आहे.
विधान परिषदेच्या 11 जागांच्या निवडणुकीचा कार्यक्रम निवडणूक आयोगाने जाहीर केला आहे. विधानसभा सदस्य विधान परिषदेतील आमदारांची निवड करणार आहेत. 25 जून पासून 2 जुलै पर्यंत अर्ज भरण्याची मुदत असणार आहे. पाच जुलै रोजी अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत असेल. 12 जुलै रोजी रोजी मतदान होणार आहे. सकाळी 9 ते संध्याकाळी चार या वेळेत मतदान पार पडणार आहे. 12 जुलै रोजीच होणार पाच वाजल्यानंतर मतमोजणी सुरुवात होईल.
असा असेल निवडणूक कार्यक्रम
निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या निवडणूक कार्यक्रमानुसार विधानपरिषदेच्या 11 जागांसाठी येत्या 12 जुलै रोजी मतदान होईल. त्याच दिवशी म्हणजेच 12 जुलै रोजी निकाल जाहीर केला जाईल. या निवडणुकीसाठी येत्या 25 जून रोजी निवडणूक आयोगाकडून अधिसचून जारी केली जाईल. त्यानंतर उमेदवारांना 2 जुलैपर्यंत आपला उमेदवारी अर्ज दाखल करता येईल. 3 जुलै रोजी अर्जांची छानणी केली जाईल. तर उमेदवारांना आपला उमेदवारी अर्ज 5 जुलैपर्यंत मागे घेता येईल. 12 जुलै रोजी या निवडणुकीसाठी प्रत्यक्ष मतदान होईल. सकाळी नऊ ते चार वाजेपर्यंत यासाठी मतदान करता येईल. 12 जुलै रोजीच मतमोजणी करून निकाल जाहीर केला जाणार आहे.
खालील आमदार होणार निवृत्त
विधानसभेच्या आमदारांनी मतदानाच्या माध्यमातून नियुक्त केलेले विधानपरिषदेच्या 11 आमदारांचा कार्यकाळ येत्या 27 जुलै रोजी संपणार आहे. त्यामुळे त्यांच्या जागेवर अन्य व्यक्तींची आमदार म्हणून निवड केली जाईल. 27 जुलै रोजी कार्यकाळ संपणाऱ्या आमदारांमध्ये विजय गिरकर, निलय नाईक, रमेश पाटील, रामराव पाटील (भाजप), महादेव जानकर (भाजप मित्र पक्ष), अनिल परब (शिवसेना ठाकरे गट), मनीषा कायंदे (शिवसेना शिंदे गट), डॉ. वजाहत मिर्झा व डॉ. प्रज्ञा सातव (काँग्रेस), बाबाजानी दुराणी (राष्ट्रवादी), जयंत पाटील (शेकाप) या 11 आमदारांचा समावेश आहे.